बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

गडचिरोली : अंगभर काटेसदृश रचना असलेले काटवल हे फळ दोन वर्षांत कोरोना विषाणूसारख्या अनोख्या रूपामुळे कोरोनाफळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या फळाची भाजी पावसाळ्यात एकदा तरी खावी म्हणजे आजार होत नाहीत, अशी याची ख्याती असल्याने ही भाजी लोकप्रिय आहे. सध्या हे कोरोनाफळ बाजारात दाखल झाले आहे. अतिशय महाग म्हणजे तब्बल ७० रुपये पाव या दरात विकले जात आहे. (Katwal-Medicinal-properties-Useful-for-health-Coronafruit-nad86)

पूर्वीपासून पावसाळ्यात काटवल किंवा करटोली नावाचे हे छोटे हिरवे फळ भाजी म्हणून खाण्याची परंपराच आहे. फार चविष्ट नसले, तरी अनेक आजारांवर लाभप्रद असल्याने या फळाची भाजी आवर्जून खाल्ली जाते. जगभरात कोरोनाचा बोलबाला सुरू झाल्यापासून काही जणांना या फळातही कोरोना विषाणूचे रूप दिसले. त्यामुळे अनेक जण याला आता कोरोनाफळ, असेही म्हणतात.

बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने
मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

हे कोरोनावर औषध नसले, तरी रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याने आरोग्यासाठी हितकारकच आहे. पूर्वी या फळभाजीला फार मागणी नव्हती. परंतु, कोरोनाने आरोग्याचे महत्त्व आपल्या निष्ठुर पद्धतीने पटवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा ओढा नैसर्गिक उगवणाऱ्या वनस्पती, भाज्यांकडे वाढला आहे. त्यामुळे या फळाची मागणी वाढली असून दरही वाढले आहेत. सध्या हे फळ ७० रुपये पाव म्हणजे २८० रुपये किलो दराने विकले जात आहे.

करटोली किंवा काटवल या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ‘कुकरबिटेसी’ म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. हिला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. ग्रामीण भागात अनेकांच्या अंगणात किंवा शेतात याचे वेल असतात. याच्या स्त्रीजातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात. कंद लंबगोलाकार, पिवळट-पांढरे असून त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची चव तुरट असते.

कंदात रेचकपणा नाही; पण थोडासा रक्तसांग्राहिक धर्म आहे. मात्रा मोठी झाल्यास उलटी होते. याशिवाय याची पाने, फुले, फळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदात होतो. पावसाळ्यात होणारे जलजन्य व इतर आजार दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असल्याने व ही फळभाजी पावसाळ्यात काहीच दिवस मिळत असल्याने आवडीने खाल्ली जाते.

बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने
‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

हे आहेत औषधी उपयोग

  • डोकेदुखीत याच्या पानांचा रस, मिरे, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात

  • मूळव्याधीत रक्त पडत असेल तर कंदाचे चूर्ण देतात

  • कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहातही देतात

  • डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांतही कंदाचा वापर करतात.

  • आतड्यांच्या तक्रारीतही उपयोगी आहे.

  • पाने कामोत्तेजक व कृमिनाशक असून ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी यात गुणकारी आहेत.

  • याचे फळ वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात उपयुक्त आहे.

  • अतिलाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास, रक्तरोग, डोळ्यांचे रोग, धावरे या विकारातही वापरतात.

  • याची भाजी पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते.

(Katwal-Medicinal-properties-Useful-for-health-Coronafruit-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com