esakal | अवकाळी पावसाने पुन्हा मोडले बळीराजाचे कंबरडे; अंदाजे सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Rains in Buldana district have caused severe damage to farmers on seven thousand hectares

बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

अवकाळी पावसाने पुन्हा मोडले बळीराजाचे कंबरडे; अंदाजे सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा :  गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे सात हजार हेक्टरवरील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या बळीराजाचे या नुकसानीमुळे कंबरडे मोडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे वादळ, कुठे गारपीट; तर कुठे पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्‍यांचे यामध्ये नुकसान झालेले आहे.

पानमळे मोजताहेत शेवटची घटका; लघुउद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी  

बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे प्रामुख्याने कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, पपई, भुईमूग, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा मोहर ही मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने आंबा पिकाला ही मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत.

loading image