अकोला : राखी निर्मिती व विक्रीतून दिव्यांगांना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha bandhan 2022

अकोला : राखी निर्मिती व विक्रीतून दिव्यांगांना रोजगार

अकोला : दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात ता. १ ते ४ ऑगस्ट २०२२ दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. दिव्यांग शिक्षणासोबत रोजगार मिळावा या हेतूने सदर कार्यशाळेत दिव्यांग महिलांनी ११ हजार राख्यांची निर्मिती केली.

राख्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे अकोल्याच्या विविध शाळा, महाविद्यालय व बाजारपेठेत स्टॉल लावून विकल्या जाणार आहेत. अपेक्षा अपार्टमेंट क्र. १, फ्लॅट क्रमांक ७ ,गणेश नगर, लहान उमरी अकोला या संस्थेच्या कार्यालयात आणि शिवाजी महाविद्यालय अकोलाच्या दिव्यांग कक्षात या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या भारताच्या विविध शहरात पाठवल्या जात आहे. एवढेच नव्हे तर भारताबाहेरही या राख्यांना चांगली मागणी लाभत आहे.

राखी विक्रीतून निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी

दिव्यांगांनी तयार केलेल्या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे. विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय व महिला वर्गाद्वारा या उपक्रमाला प्रतिसाद, असे आवाहन संस्थेचे प्रा.अरविंद देव, प्रसाद झाडे, भारती शेंडे, अनामिका देशपांडे, डॉ.सोनल कामे, श्रद्धा मोकाशी, डॉ.संजय तिडके, श्वेता धावडे, पूजा गुंटीवार, प्रसन्न तापी, सुजाता नंद यांनी केले आहे.

Web Title: Raksha Bandhan 2022 Rakhi Production Employment For Handicapped Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..