Ration Wheat : रेशनच्या गहू वाटपला पुन्हा कात्री! सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती होणार कमी

शासनाने लाभार्थ्यांचा गहू वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रESAKAL
Updated on

अकोला - राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते. शासनाने लाभार्थ्यांचा गहू वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे. सदर बदल मार्च २०२५ पासून लागू होणार असून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com