esakal | वाढीव रेटने विकत होते कोरोना रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन , महिलेसह वॉर्ड बॉयला अटक

बोलून बातमी शोधा

वाढीव रेटने विकत होते कोरोना रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन , महिलेसह वॉर्ड बॉयला अटक
वाढीव रेटने विकत होते कोरोना रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन , महिलेसह वॉर्ड बॉयला अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी संजीवणी ठरत असलेल्या रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या प्रकरणी बिहाडे हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ असलेल्या एका महिलेसह एका वॉर्ड बॉयला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोनल फ्रान्सिस मुजमुले, भाग्येश प्रभाकर राऊत, असे आरोपींची नावे आहेत.

रामनगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली होती. या माहितीवरून या गौरखधंद्यातील आरोपी आशिष समाधान मते याच्याकडून बिना देयक, प्रिस्क्रिप्शनशिवाय रेमडेसिविर हे इंजेक्शन चार हजार रुपयांचे असताना तब्बल २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

त्याचे साथीदार राहुल गजानन बंड (२६ रा. भारती प्लॉट, जुने शहर), सचिन हिंमत दामोदर (३० रा. अशोकनगर, अकोट फाइल), प्रतीक सुरेश शहा (रा. रामनगर), अजय राजेश आगरकर (२५, रा. बाळापूर नाका) या आरोपीला ता. २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. या पाच आरोपींनी दिलेल्या माहितीवरून बिहाडे केअर सेंटर तथा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ असलेल्या सोनल फ्रान्सिस मुजमुले (२७, रा. लहरियानगर कौलखेड), भाग्येश प्रभाकर राऊत (२९, रा. इंजिनिअरिंग कॉलनी मोठी उमरी) या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो