ओबीसीशिवाय आरक्षण जाहीर

महानगरपालिका निवडणूक : ४६ महिलांसाठी प्रभाग राखीव; हरकतीसाठी मिळणार सहा दिवस
Akola Muncipal Corporation
Akola Muncipal Corporationsakal

अकोला - राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका निवडणूक होणार नाही, असे जाहीर केले असले तरी मंगळवारी (ता. ३१) ओबीसी आरक्षणशिवाय अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात ९१ पैकी ४६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सामाजिक व महिला आरक्षण अंतिम होण्यापूर्वी हरकती व सूचनांसाठी ता. ६ जूनपर्यंत वेळ मिळणार आहे.

अकोला महानगरपालिकेच्या ३० प्रभागातील ९१ जागांसाठीच्या महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आली. आयुक्त कविता द्विवेदी यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत झाली. प्रभाग रचना अधिसूचनेसोबतच प्रभागांचे सामाजिक आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार निश्चित झाले होते. त्यामुळे महिलांसाठी कोणते प्रभाग आरक्षित होतात याची उत्सुकता शिल्लक होती. तीन सदस्यीय प्रभागानुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे प्रभागाचे तीन भाग पाडून आरक्षण सोडत काढण्यात आली.

असे काढली सोडत

मनपाचे ९१ पैकी १५ सदस्य हे अनुसुचित जातीचे व दोन सदस्य अनुसुचित जमातीचे आहेत. त्यातील अनुसुचित जातीच्या १५ पैकी आठ जागा महिलांसाठी तर अनुसुचित जमातीच्या दोन पैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात. त्यांची सोडत काढल्यानंतर प्रभागातील ‘अ’ गटाच्या उर्वरित २१ जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. याशिवाय ज्या नऊ प्रभागातील ‘अ’ गट हे अनुसुचित जाती व जमातीसाठी राखीव झाले, त्या प्रभागातील नऊ ‘ब’ गट हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. महिला सदस्यांची संख्या ही ४६ असल्याने उर्वरित सात जागांसाठी २१ प्रभागातील ‘ब’ गटांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्यात.

अशी आहे आरक्षणाची स्थिती

एकूण प्रभाग ः ३०

एकूण जागा ः ९१

महिलांसाठी राखीव ः ४६

अनुसुचित जाती ः १५ (पैकी आठ महिला)

अनुसुचित जमाती ः दोन (पैकी एक महिला)

सर्वसाधारण ः ७४ (पैकी ३७ महिला)

महिला आरक्षणाने कही खुशी, कही गम!

महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांकरिता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. यात ४६ जागा या महिलांसाठी राखीव झाल्यात. पैकी काही प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्या असल्याने निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. प्रभागातील प्रत्येक पक्षाचा प्रभावी नेता जागा सोडणार नाही. त्यामुळे इच्छुकांना येथे घराच्या महिलांना निवडणूक रिंगणात उतरविणे भाग पडेल किंवा बाजूला सोयीचा प्रभाग निवडावा लागणार आहे.

नेत्यांचे ठरले! कार्यकर्त्यांना कुठे उभे करायचे?

सामाजिक व महिला आरक्षण निश्चित झाल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कोणत्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरावयाचे हे निश्चित झाले आहे. यात भाजप सर्वात पुढे असून, त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचा क्रम लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे मात्र अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू आहे.

प्रभाग निहाय्य आरक्षण

प्रभाग क्र. अ ब क ड

१ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२ अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

३ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

४ अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

५ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

६ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

७ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण -----

८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

९ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१० अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

११ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण -----

१२ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१३ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण -----

१४ अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१५ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१६ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण ------

१७ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१८ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

१९ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२० अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२१ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण -----

२२ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण -----

२३ अ.जा. महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२४ अ. जमाती महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२५ अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२६ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२७ अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

२९ अ. जमाती सर्वसाधारण महिला सर्वसाधारण -----

३० अ.जा. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com