अकोला : धक्कादायक, महिला पोलिस उपनिरीक्षकाची रिव्हॉल्वर चोरी

सुटीवर असताना घरीच चोरट्याने केला हात साफ
Rivolver
RivolverSakal

अकोला - शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे पुन्हा एका घटनेवरून सिद्ध झाले आहे. चोरट्यांनी थेट पोलिसांच्या निवास स्थानालाच लक्ष्य करीत महिला पोलिस उपनिरीक्षकाची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस हेडकॉटरमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सरिता कुवारे या ता. २१ ते २५ एप्रिल या कालावधीत सुट्टीवर होत्या. ता. २५ एप्रिल रोजी त्या घरी परतल्या. त्यांनी ड्युटीवर जाण्यासाठी तयारी केली. नेहमी सोबत असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर घरात शोधूनही मिळाली नाही. अखेर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरी झाल्याचे कुवारे यांच्या लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. सर्व्हिस रिव्हॉल्वरसह काही जिवंत काडतुसही चोरांनी नेलेत. घरात इतर कोणत्याही वस्तूला चोरांनी हात लावला नसल्याने सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरणे हाच चोरट्यांचा उद्देश होता का, असा प्रश्न पोलिसांना पडला असून, त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. सात संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com