वाढत्या महागाईमुळे गरिबांची दमछाक; परिस्थिती बिकट

महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले; परिस्थिती बिकट
महागाई भत्ता
महागाई भत्ताSakal

शिरपूर जैन : ग्रामीण भागातील महिला व नागरिक वाढत्या किराणा, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे हैराण झाले आहेत. किराणा सामानांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे, त्यात खाद्यतेलाचे भाव चांगलेच वधारले असून सरासरी किलोचे १७० रुपये मोजावे लागत आहेत व मिरची, मसाला आदींच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.मुख्यत्वे तेलाचे दर वाढले असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

उन्हाळा असल्याने शेतात सुद्धा महिलांना फारसे काम मिळत नसल्याने महिलांना घर कसे चालवावे? हा प्रश्न पडला आहे.दिवाळीनंतर तेलाचे भाव कमी होतील अशी आशा होती, मध्यंतरी कमी भावाने खाद्य तेल मिळायचे, आता सोयाबीन असो की फली तेल सर्वच खाद्य तेलाचे भाव वाढले आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रिपल फिल्टर तेलाला चांगलीच मागणी असते. मात्र विविध कारणांनी खाद्यतेलाचे भाव सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे. आधीच कोरोना संकटामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले होते. त्यातच जीवनावश्यक वस्तुंच्या भाव वाढीमुळे समस्या अधिकच कठीण झाली आहे.

राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंब करीत असले तरी तीन वर्षापासूनचे रडगाणे संपायचे नाव घेत नाही. अजूनही त्यात वाढ होणार काय? अशा चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहेत.

प्रत्येक वस्तू महाग होत असेल तर सर्वसामान्यांनी बजेटमध्ये घर चालवायचे तरी कसे? असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत, यानंतर पेट्रोल व डिझेल या इंधनाचे दर वाढतील अशी दाट शक्यता आहे.याची झळ सर्वसामान्य जनतेला बसेल.यामुळे पुन्हा महागाई वाढण्याचे संकेत दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com