RTE प्रवेशाची मुदत संपली, शाळा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

RTE प्रवेशाची मुदत संपली, शाळा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच

अकोला : शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करणाऱ्या व लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेल्या एक हजार ८१७ विद्यार्थ्यापैकी अद्याप केवळ १ हजार ४३९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या फेरीमध्ये निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती. परंतु, सदर मुदत आता संपल्यामुळे (RTE admission date) शिक्षण विभागाच्या पुढील आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शाळा सुरू होऊन १५ दिवसांवर वेळ झाल्यानंतर सुद्धा अद्याप आरटीई प्रवेशाचा गोंधळ सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (rte admission closed in akola)

हेही वाचा: म्युकरमायकोसिस रुग्ण वाढणार? काय म्हणातात वैद्यकीय तज्ज्ञ

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७०७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले. क्षमतेपेक्षा २ हजार ७४७ जास्त अर्ज आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात १ हजार ९६० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जून महिन्यापासून सुरुच आहे. परंतु, अद्याप संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी प्रतीक्षेतच -

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी १ हचार ८१७ विद्यार्थ्यांच्या नावाची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. तर इतरांनी प्रतीक्षेत ठेवण्यात आले. दरम्यान दोन महिन्यांपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसंदर्भात निर्णय न झाल्याने त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.

अशी आहे स्थिती

  • नोंदणीकृत शाळा - २०२

  • प्रवेशासाठी प्राप्त अर्ज - ४७०७

  • आरक्षित जागा - १९६०

  • प्राप्त अतिरिक्त अर्ज - २७४७

  • आतापर्यंत निवड झालेले - १८१७

  • तात्पुरते प्रवेश - ७५४

  • निश्चित प्रवेश - १४३९

Web Title: Rte Admission Closed In Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola