भजन, कीर्तन, प्रवचनासाठी नियमावली ठरवणार ; वारकऱ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटनांच्या माध्यमातून वारकऱ्यांनी अकोला येथे आठ दिवस उपाेषण केले हाेते. तेव्हा शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाचे शिष्टमंडळाने मुंबईला मंत्र्यांची भेट घेतली. 

अकोला : भाविकांचा सहभाग असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन करा; वारकऱ्यांवर कारवाई हाेणार नाही, अशी ग्वाही पर्यटनमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वारकऱ्यांना दिली. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा : जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज

वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटनांच्या माध्यमातून वारकऱ्यांनी अकोला येथे आठ दिवस उपाेषण केले हाेते. तेव्हा शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाचे शिष्टमंडळाने मुंबईला मंत्र्यांची भेट घेतली. 

हे ही वाचा : जिल्ह्यात ४८ कोरोना पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू

यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने शिष्टमंडळातील हभप गणेश महाराज शेटे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शाल श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी विक्रम महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, विलास महाराज कराड, राजेंद्र कोलट्टके उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rules will be drawn up in Akola to allow religious activities involving devotees