

CCTV Tender Rush in Schools Sparks Controversy Amid Election Code Deadline
Sakal
अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेमुळे धावाधाव करत मंगळवारी (ता.४) सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, आता आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे.