Buldhana : रेती माफियांचा हैदोस, ट्रॅक्टर चालकाने चालविले कोतवालांच्या पायावरून ट्रॅक्टर; उपचारादरम्यान 'कोतवाल'चा मृत्यू

कोलद काटेल नजीकच्या वान नदीपात्रात रेती उपसा सुरू होती. याची माहिती 16 एप्रिल रोजी संबंधित महसूल पथका ला मिळाली. त्यावरून वान नदीच्या पुलाजवळ तलाठी बोडखे आणि त्यांचे सहकारी गस्त लावून बसले होते.
sand smuggler
sand smugglerSakal

संग्रामपूर(बुलढाणा) : तालुक्यातील कोलद काटेल नजीक च्या वान नदीपात्रात रेती उपसा सुरू होती. याची माहिती 16 एप्रिल रोजी संबंधित महसूल पथका ला मिळाली. त्यावरून वान नदीच्या पुलाजवळ तलाठी बोडखे आणि त्यांचे सहकारी गस्त लावून बसले होते.

नदीपात्रात उभा असलेला ट्रॅक्टर चालकाने कोतवाल लक्ष्मणअस्वार(एकलारा ) यांच्या पायावरून ट्रॅक्टर चालविले. त्यात अस्वार यांचा पाय निकामी झाल्याने अस्वार यांना लगेच उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले होते. . ही गंभीर घटना रात्री १० वाजता चे दरम्यान घडलेली आहे.

याबाबत ची माहिती संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोंपे याना मिळताच त्यांनी तामगांव पोलीस स्टेशन गाठले. आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा करून संबंधित घटनेची तक्रार दिली.उपचारा दरम्यान कोतवाल लक्ष्मण अस्वार यांच निधन झाल्याची बातमी 17 एप्रिल रोजी पसरली.

पोलिसांनी पथकाद्वारे या घटनेचा तपास सुरू केला असून ट्रॅक्टर चालक फरार असल्याची माहिती मिळत आहे. अकोला येथील मेन हॉस्पिटल शवविच्छेदन केल्यानतंर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या संदर्भात तामगाव पोलिस स्टेशन मध्ये दिलेली फिर्याद अशी ,देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे, वय 37 वर्ष, जात-बारी, व्यवसाय नोकरी, तलाठी एकलारा रा. संग्रामपुर मी समक्ष पोलीस स्टेशन तामगांव येथे येऊन तोंडी रिपोर्ट देतो की, वरील प्रमाणे राहणारा असुन एकलारा बानोदा येथे मागील 04 वर्षापासुन तलाठी या पदावर कार्यरत आहे.

मा. तहसिलदार साहेब, संग्रामपुर यांचे आदेशाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुध्द पथक गठीत करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथक प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी श्री बोराखडे तसेच सहाय्यक मदतनिस म्हणून तलाठी श्री. श्रेयस डाबरे, कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार व मी स्वतः असे पथक गठीत आहे.

काल दिनांक 16/04/2024 रोजी रात्री 20/00 वा काटेल कोलद येथील वान नदीमध्ये अवैध वाळुची वाहतुक सुरू असल्याबाबत गोपनिय सुत्रांनकडुन माहीती मिळाल्याने मी स्वतः व आमचे सोबत तलाठी श्री श्रेयस डाबरे, कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार असे तत्काळ ग्राम कोलद येथे रवाना होवून पोहचलो असता, आम्हाला रेतीने भरलेले विना नंबरचे निळ्या कलरचे ट्रॅक्टर व लाल कलरच्या ट्रॉलीसह आढळले.

ट्रॅक्टर चालकाने आम्हाला पाहताच सदर ट्रॅक्टर चालु करून पळुन जात असताना त्यावेळी कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार हे कोलद पुलावर असताना त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रॅक्टर चालक यांने सदर वाळुने भरलेले ट्रॅक्टर लक्ष्मण भिकाजी अस्वार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अंगावर नेवून गंभीर जखमी केले व ट्रॅक्टरसह पळून गेला. नंतर तेथे बरेच लोक जमा झाल्याने लक्ष्मण भिकाजी अस्वार यांना तात्काळ लोकांनी ग्रा. रु.

वरवट बकाल येथे उपचाराकामी आणले व तेथुन त्यांना पुढील उपचारकामी अकोला येथे रेफर केल्याने लक्ष्मण अस्वार याना इलाजकामी त्यांचे नातेवाइकासह अकोला येथे पाठविले. मला कोलद पुलावर जमा असलेले लॉकांकडुन माहीती पडले की, सदर ट्रॅक्टर राजु कुचेकर रा. पळसोडा यांचे मालकीचे असल्याचे व सदर ट्रॅक्टरवरील चालक संतोष पारीसे (पूर्ण नाव माहीत नाही) रा- खळद हा असल्याचे माहीती पडले आहे.

आता मला लक्ष्मण भिकाजी अस्वार यांचे नातेवाइकांकडून माहीती मिळाली की, लक्ष्मण भिकाजी अस्वार यांना अकोला येथील आयकॉन हॉस्पीटल येथे उपचारा करीता नेले असता, त्याला डॉक्टरांनी तपासुन मृत पावल्याचे सांगीतले आहे, अशी माहीती मिळाली आहे.

तरी आम्ही आमचे सरकारी काम पार पाडत असताना विना नंबरचे निळ्या कलरचे ट्रॅक्टर व लाल कलरच्या ट्रॉलीच्या चालक नामे संतोष पारीसे रा- खळद यांने वाण नदीतील वाळु अवैधरित्या चोरुन नेत असताना त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता,

त्याने सदर वाळुने भरलेले ट्रॅक्टर न थांबवता लक्ष्मण भिकाजी अरवार, वय- अंदाजे 40 वर्षे, रा-एकलारा बानोदा यांना जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे अंगावरून नेऊन गंभीर जखमी करुन जीये मारुन टाकले आहे.या नुसार पुढील कार्यवाही तामगाव पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com