नवरदेवाला कपड्यांसह मास्क व परफ्यूम ऐवजी सॅनिटायझर

संसर्ग होऊ नये यासाठी लग्न समारंभ आयोजित करणारी कुटुंबे खबरदारी
Navardev
Navardevsakal

शिरपूर जैन : कोरोनाचा तिसरा लाटेचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि संस्कारावर होत आहे. संसर्ग होऊ नये यासाठी लग्न समारंभ आयोजित करणारी कुटुंबे खबरदारी घेत आहेत. त्यांच्या याद्या लहान केल्या जात आहेत. त्यामुळे लग्नसमारंभात फारच कमी लोक येत आहेत. सामाजिक अंतर पाळून सर्व कामे केली जात आहेत. त्याचबरोबर नवरदेवाला कपड्यासोबत मास्क ही दिला जात आहे. परफ्युम ऐवजी सॅनिटायझर दिले जात आहे. जेणेकरून आपण कोरोनापासून वाचू शकू.

Navardev
ऑनलाइन सभेदरम्यान नगरसेवकाकडून सिगारेटचे झुरके

वराला पातळ स्तराचा मास्क दिला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर सर्व काही सुरळीत झाले होते. मात्र तिसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा लग्नसराईची मजा गेली आहे. पाहुण्यांची संख्या कमी केली जात आहे. त्याचबरोबर पाहुण्यांना मोबाईलवरून निमंत्रण पत्रिका पाठवली जात आहेत. याशिवाय फूड कुक, बुक करण्यापूर्वी लोक काळजी घेत आहेत, की त्यांच्यात काम करणाऱ्या कामगारांपैकी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह नाहीना!

कोरोना संसर्गापूर्वी लग्नमंडपात वर्हाडी येताच घरातील लोक अत्तर लावून त्यांचे स्वागत करायचे. त्यांच्या हातात पुष्प दिले जात होते. परंतु कोरोनामुळे याला ब्रेक लागला आहे. आता परफ्यूम ऐवजी सॅनिटाइजर व स्वागतासाठी फुलाऐवजी मास्क दिला जात आहे. एवढेच नाही तर मिठी मारणे ऐवजी वधू-वरांच्या मंडळीकडून लोक एकमेकांना दुरूनच हात जोडून अभिवादन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com