Akola News : पाणी टंचाईवर उपाययोजनांसाठी सरपंच एका मंचावर

खारपाणपट्यात येणाऱ्या ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळावे यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व सरपंच एका मंचावर आलेत.
Sarpanch Meeting
Sarpanch MeetingSakal

अकोला - खारपाणपट्यात येणाऱ्या ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळावे यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व सरपंच एका मंचावर आलेत. उपाययोजना प्रशासनाकडून करून घेण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धारही संरपंच व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे आमदार नितीन देशमुख व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचे मार्गदर्शनात आयोजित बैठकीला खांबोरा पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावातील सरपंच व जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री राठोड, उपअभियंता श्री चौधरी तसेच जि. प. पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री दरेकर उपस्थित होते.

प्रस्ताविकात शिवसेना उपजिल्हा प्रमुख विकास पागृत यांनी पाणीपुरवठ्यातील अनियमितता, दिवाळीला सुद्धा अनेक गावात पाणी नव्हते, अनेक ठिकाणी दीड महिन्यात एखाद्या वेळेस पाणी पुरवठा होतो, धरणात पाण्याचा साठा असताना पाणी मिळत नाही, योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ जि. प. कडे नाही, नवीन मंजूर असलेले पाईप लाईन नूतनीकरण कामे ही अर्धवट आहेत, अनेक ठिकाणी पाईपलाईन लीकिज आहेत, आदी समस्यांचा पाढा वाचला.

त्यावर बैठकीत तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नवीन पाईप लाईनचे काम राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या परवानगीसाठी थांबले होते. आता परवानगी मिळाली असून, एक दोन ठिकाणी पाईप लाईनचे काम अपूर्ण आहेत, ते येत्या महिन्याच्या आत पूर्ण करून किमान चार दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.

महान येथील धरणात खूप दिवसाचा गाळ साचला असल्यामुळे भविष्यात देखील या योजनेच्या नुतनिकरणावर केलेला शासनाचा ८० कोटी रुपये खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात ह्या योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. संबंधित सर्व ग्रामपंचायतनी तसा ग्रामसभेत ठराव करून शासनाकडे मागणी करण्यात यावी असे एक मुखाने ठरविण्यात आले. वेळ प्रसंगी आंदोलन सुद्धा करण्याची तयारी असल्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

यावेळी सर्वच पक्षांचे सरपंच उपस्थित होते. संयोजक राहुल कराळे, संजय भांबेरे, पं. समिती सदस्य भास्कर अंभोरे, भारत बोरे, नितीन ताथोड, गोपाल इंगळे, जयगोपाल ठाकरे, दिलीप मोहोड, किशोर पाटील हलवने, गंगाधर पाटील इंगळे, आतिष शिरसाठ, सतीश टोबरे, सुनील खेळकर, रामेश्वर गोहाडे, शरद ठाकरे, ज्ञानेश्वर जाधव, प्रीतीमेश म्हातूरकर, सुमित तवाडे, गणेश काळमेघ, मनीष वर्गे, रामेश्वर सराटे, कैलास डाबेराव, वासुदेव वक्ते, सारंगधर गावंडे, गजानन बाहकर, रामेश्वर सराटे, कोंडूराम वाघमारे, राहुल तेलगोटे, विठ्ठलराव काळे यांचे सह पंचायत समिती सदस्य, जि. प सदस्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सीईओंसोबत २३ ला बैठक

कंत्राटी नोकर भरती व योजनेसाठी आवश्यक असलेले मनुष्याबळ उपलब्ध करून घेणे, वीज पुरवठा सुरळीत करणे अशा ह्या सर्व समस्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे मार्फत सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही बैठक वेळ घेऊन ता.२३ नोव्हेंबर रोजी करण्याचे ठरविले. यासाठी सर्व पक्षभेद बाजूला सारून खारपानपट्ट्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com