esakal | ग्रामीण भागात वाजली शाळेची घंटा, दीड वर्षानंतर पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट
sakal

बोलून बातमी शोधा

school

पुन्हा वाजली शाळेची घंटा, दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (जि. बुलडाणा) : मेहकर (mehkar buldana) तालुक्यातील कोविडमुक्त गावात अखेर शाळेची घंटा (school start) वाजली. दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत दिसून आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. तालुक्यातील एकूण ५५ शाळा सुरू झाल्या आहेत. (school starts in rural area of buldana)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

करोना संकटात दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. या दरम्यान मुले ऑनलाइन शिक्षण घेत होती. आता करोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून सुरू झाले आहेत. मेहकर तालुक्यात करोनामुक्त असलेल्या गावात आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला आहे. मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळा वर्ग ८ ते १२ प्रयत्न ८६ शाळा आहेत. त्यापैकी तालुक्यात ५५ शाळांची घंटा वाजली आहे. यामध्ये जि. प. शाळा ३४ पैकी ३० शाळा चालू झाल्या तर खासगी शाळा ५२ पैकी २५ शाळा चालू झाल्या. अशा एकूण ८६ पैकी ५५ शाळेची घंटा वाजली आहे. राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने कोरोना मुक्त गावातील शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे परत १५ जुलै पासून कोरोनामुक्त असलेल्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षपणे शाळा भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नये. यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. परंतु, शाळा बंद असल्याने होणारे परिणाम पाहता. वाढते बालविवाह, बालमजुरी, मानसिक ताणतणाव आणि शाळेबद्दल गोडी न राहणे या तक्रारी येत आहे. यामुळे जी गावे कोरोनामुक्त आहेत. अथवा जिथे मागील तीस दिवसात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. अशा गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.

''मेहकर तालुक्यातील जि.प व खासगी शाळा वर्ग आठ ते बारावी पर्यत ८६ शाळा सुरू करण्यात आले आहेत. कोविड १९ चे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करून आणि सॅनिटायझर लावून प्रवेश देण्यात आला. विद्यार्थीसंख्या पहिल्या दिवशी कमी असली तरी पालकांनी शाळेत येणासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, मुलांमध्ये उत्साह असल्याचे शिक्षकांनी सांगितले.''

- मधुकर वानखेडे, गटशिक्षणाधिकारी, मेहकर.

जिल्ह्यात २२८ शाळा सुरू

कोरोना प्रतिबंधामुळे बंद झालेल्या शाळांपैकी वर्ग ८ ते १२ मधील खासगी व अनुदानित एकूण ११०३ शाळांपैकी ग्रामीण भागातील नियम व अटींची पूर्तता केल्यानंतर २२८ शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

loading image