लहान मुलांना कोरोना, घाबरू नका! आहे स्वतंत्र व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाधित बालकांसाठी उपलब्ध आहे स्वतंत्र व्यवस्था

लहान मुलांना कोरोना, घाबरू नका! आहे स्वतंत्र व्यवस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेची (The third wave of Covid 19) शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात रुग्णांच्या उपचाराकरिता सुविधांची निर्मिती करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्या अनुशंगाने ५९० जादा (Bed) खाटा, वाढीव ऑक्सिजन (Oxygen) उपलब्धता तसेच औषधे व मनुष्यबळ उपलब्धता या सोबतच लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड (Separate covid ward for young children) बाबतही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. (Separate Covid ward for children in Akola district)

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

जिल्ह्यात सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये ६४० खाटा तर खाजगी रुग्णालयांत ७६७ खाटा अशा एकूण १४०७ खाटांची उपलब्धता आहे. वाढत्या रुग्ण संख्येचे अनुमान लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये २०० खाटांचे नियोजन असून त्यात ६० खाटा या केवळ लहान बालकां साठी राखीव असतील.

याच ठिकाणी २० खाटांचा अतिदक्षता विभाग व ४० खाटांचा ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० खाटा अतिरिक्त तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात २० याप्रमाणे बाळापूर, तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी याप्रमाणे एकूण ८० खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तर पातुर येथील आयुर्वेद महाविद्यालयात ५० असे तालुकास्तरावर एकूण १३० खाटांचे नियोजज असून एकूण ५९० खाटांची वाढ नियोजित आहे.

ऑक्सिजन निर्मिती क्षमतेतही वाढ
जिल्ह्यात सद्यस्थितीत ७३ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे. त्यात वाढ करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० मेट्रिक टन क्षमतेचा अतिरीक्त ऑक्सिजन टॅंक बसविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० मेट्रिक टन क्षमतेचा टॅंक तर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे संयंत्र (पीएसए प्लॅंट) बसविण्याचेही नियोजन आहे. महाजेनकोच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित होईल. बाळापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथेही पीएसए प्लॅंट बसविण्यात येणार आहे.

हेही वाचा: ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

औषधाची उपलब्धता
राज्य टास्क फोर्सने जारी केलेल्या निर्देशांप्रमाणे कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचार कार्यपद्धतीनुसार सर्व कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये येथे उपलब्ध खाटांची संख्या विचारात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली औषधींचे वितरण होत आहे. लहान मुलांसाठी द्यावयाच्या औषधांचीही उपलब्धता करण्यात आली आहे.

Oxygen Bed

Oxygen Bed


वाढीव खाटानुसार आवश्यक मनुष्यबळ
वाढीव खाटांची संख्या निहाय रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागाकडून उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचे नियोजन हे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आले आहे.

लहान मुलांसाठी विशेष कक्ष
लहान बालकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वतंत्र वार्ड तयार करण्यात येत आहे. त्यात लहान मुलांसाठी २० खाटांचा अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेले ४० असे ६० खाटांचा सुसज्ज कक्ष असेल. तसेच लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर्सही नियुक्त करुन डॉक्टरांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Separate Covid ward for children in Akola district

loading image
go to top