अकोल्यातील सात गुन्हेगारांवर ‘मोक्का’

नवरात्रोत्सवाला सुरुवात होतानाच पोलिसांनी अकोला शहरातील गुन्हेगारीची स्वच्छता करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Mokka
MokkaSakal
Summary

नवरात्रोत्सवाला सुरुवात होतानाच पोलिसांनी अकोला शहरातील गुन्हेगारीची स्वच्छता करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अकोला - नवरात्रोत्सवाला सुरुवात होतानाच पोलिसांनी अकोला शहरातील गुन्हेगारीची स्वच्छता करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या सात गुन्हेगारांवर अकोला पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांवर वचक बसविणारा हा निर्णय आहे.

सिव्हिल लाईन्सचे प्रभारी अधिकाऱ्यांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगार सुहास सुरेश वाकोडे (२५,टोळी प्रमुख), ऋतीक सुधिर बोरकर (२०), गणेश राजू कॅटले (२५), राहुल नामदेव मस्के (२१), सोनू उर्फ विशाल सुनील मंदीरेकर (२१), विशाल महादेव हिरोळे (२२) आणि दर्शन सुभाष नंदागवळी (२३) सर्व रा. अकोला यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. अकोला शहरामध्ये या गुन्हेगारांचे वर्चस्व कायम रहावे तसेच ते वास्तव्यास असलेल्या भागात त्यांची दहशत कायम रहावी याकरीता सर्व आरोपी हे स्वतंत्ररित्या व टोळीने गुन्हे करीत होते. या सर्व गुन्हेगारांवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने नमुद टोळीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे अंत्यत आवश्यक होते.

टोळीतील गुन्हेगारांवर गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांनी मागील १० वर्षांचे कालावधीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न तसेच जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे संघटीतपणे व स्वतत्ररित्या गुन्हे केल्याचे अभिलेखामध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी भानुप्रताप मडावी यांनी कलम ३०२, १२०(ब), १४३, २०१, ३४ भादंवी सह कलम चार, २५ आर्म ॲक्टमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३ (१)(i)(ii) ३(२)(४) प्रमाणे प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला यांचे कडे पाठविला होता. त्यांनी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविण्याकरिता पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व व अप्पर पोलिस अधिक्षक, अकोला यांनी प्रस्तावाची बारकाईने व काळजीपूर्वक तपासणी केली. या प्रस्तावास मंजुरीकरिता विनाविलंब विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचे कडे सादर केला. त्यांनी नमुद प्रस्तावचे अवलोकन करून त्यांना नमुद टोळी ही संघटीत गुन्हेगारी टोळी असल्याचे निदर्शनास आल्याने विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी सर्व सातही गुन्हेगारांविरूध्द मोक्का अंर्तगत कारवाई करण्याबाबतचे आदेश ता. २६ सप्टेंबर रोजी दिले आहेत.

ही कारवाई पूर्ण करण्याकरिता पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला, व पोलिस उपनिरीक्षक पालसिंग ब्राम्हण, दीपक किल्लेदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मंगेश महल्ले, सिव्हिल लाईन्स येथील पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com