

Rural Water & Sanitation Workers Await Pay for Months; Government Under Fire
esakal
-योगेश फरपट
अकोला : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांपासून वेतन रखडल्याने राज्यातील सुमारे ११०० कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. नोव्हेंबर २०२५ नंतर अद्याप वेतन अदा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे.