सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे

सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे

अकोला : स्थानीय जुन्या आरटीओ परिसरातील रामी हेरिटेज येथील रहिवासी व जसनागरा पब्लिक स्कूलचा इयत्ता सातवीतील तेरा वर्षीय विद्यार्थी विधान सुशिलकुमार अग्रवाल टेकडीवाल या विद्यार्थ्याने करोना संकट काळाचा सदुपयोग करून अप्रतिम बाल यंत्रे साकरले. त्याने अनेक उपयुक्त यंत्रे टाकाऊ वस्तूपासून निर्माण केलीत. (Seventh grade children's startup, equipment made from waste)

सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे
अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू


विधानने करोना महामारीत लॉकडाउनमध्ये घरी असल्याचा सदुपयोग करीत घरातील अडगळीत पडलेल्या टाकाऊ वस्तुपासून यंत्रे निर्माण केलीत. त्याने वैधानिक दृष्टिकोनाचा योग्य वापर करीत बनविलेले यंत्र अनेक कामात उपयोगी पडणारी आहेत. त्याने निर्माण केलेल्या या यंत्रांचा पहिला प्रयोग सोसायटीमध्ये केला. विधानने घरातील टाकाऊ वस्तूपासून ऑटोमेटीक सिझर गेम, सेन्सर बसविलेली ऑटोमॅटिक डस्टबिन, सेनिटायझरने हात धुण्याचे यंत्र निर्माण केले. या यंत्राच्या समोर हात ठेवल्याबरोबर मशीन सेन्सर ऍक्टिव्ह होऊन हॅण्डवाश बाहेर येतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकवर चालणारे तिन्ही अविष्कार विधानने कुशलतेने तयार केले आहेत.

सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे
स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत
सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे
५० गाई फुलवतात १०० एक्कर शेती, दरवर्षी होतंय लाखोंचं उत्पन्न

विधानचे सर्वत्र कौतुक
करोना महामारीत एकीकडे सर्व मुले मोबाईलमध्ये कार्टून व खेळ बघत टाइमपास करीत असताना विधानने आपला वेळ विधायक अनुसंधानासाठी खर्च करून आपल्या कल्पकतेची चुणूक दाखविली. त्याला यात त्याचे आजोबा रमेशचंद्र अग्रवाल टेकडीवाल व आजी प्रमिला अग्रवाल टेकडीवाल यांच्याकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. त्याचे वडील सुशिलकुमार अग्रवाल टेकडीवाल व आई सपना अग्रवाल टेकडीवाल यांनीही त्याला मदत केली. त्याच्या या कल्पक प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे.

संपादन - विवेक मेतकर
Seventh grade children's startup, equipment made from waste

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com