

“Akola hosts Sharad Pawar for farmers’ event
sakal
अकोला : किसान ब्रिगेडच्या वतीने आयोजित ‘शेतकरी संवाद’ या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘वेदनंदीनी’, कान्हेरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, कोणीही हार फुले आणू नये, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत शेतकरी नेते प्रकाश पोहरे, ज्येष्ठ नेते महादेवराव भुईभार व भाई प्रदीप देशमुख हे याप्रसंगी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक विभागासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन किसान ब्रिगेडचे दिवाकर गावंडे, शरद वानखडे, धनंजय मिश्रा, साहेबराव मोरे, कृपाल तात्या, नाना वराडे, भगवंत गवळी, प्रदीप गावंडे यांनी केले आहे.