Akola Murder News : शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या; दोन दिवसांनी ओळख पटली

भागवतचा मृतदेह पाण्यात राहिल्याने ओळख पटू शकली नव्हती
Shiv Sena Suburban Head Murder In Akola
Shiv Sena Suburban Head Murder In AkolaShiv Sena Suburban Head Murder In Akola

Shiv Sena Suburban Head Murder In Akola अकोला : अकोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना (Shiv Sena) उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या (Murder) करण्यात आली. तसेच मृतदेह तलावात फेकला. भागवत अजाबराव देशमुख (२८, रा. कौलखेड) असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. भागवतचा मृतदेह पाण्यात राहिल्याने ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केला होता. या प्रकरणी अकोल्यातील पातूर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

२७ ऑगस्टला पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात युवकाची हत्या झाल्याचे समोर आले होते. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.

Shiv Sena Suburban Head Murder In Akola
दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंदर चंद्रसेकर विवाहबद्ध

तलावात दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केले होते. ३० ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली असता अर्धा किलोमीटर अंतरावर रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळल्या.

या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलिस स्टेशनमध्ये दाखल होती. यानंतर युवकाची ओळख भागवत अजाबराव देशमुख अशी पटली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख २५ ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता.

अखेरीस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, भागवत याची हत्या (Murder) झाली आहे. कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्यात आला. हे समजताच कुटुंबीयांना धक्का बसलाय.

आधी गळा आवळला, नंतर मृतदेह तलावात फेकला

भागवत देशमुख याची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकला, असे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. आता अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. भागवतची हत्या २५ ऑगस्ट रोजी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com