दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंदर चंद्रसेकर विवाहबद्ध

लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
Mahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married News
Mahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married NewsMahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married News

Mahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married News दक्षिणेचे चित्रपट निर्माते रविंदर चंद्रसेकर यांनी गुरुवारी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मीसोबतशी विवाह केला. रविंदर चंद्रसेकर आणि महालक्ष्मी यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी खाजगी समारंभात लग्नाची विधी पूर्ण केली. लग्नासाठी जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना आमंत्रित केले होते. लग्नाच्या चित्रांमध्ये महालक्ष्मी पती रवींद्रचा हात धरून पारंपरिक लाल जोडप्यात दिसत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करीत महालक्ष्मीने लिहिले, ‘मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आला. तू प्रेमाने माझे आयुष्य भरले आहे.’ अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताच मित्र आणि चाहते शुभेच्छा देत आहेत. काही युजर्सनी नववधूला चंद्राचा तुकडा म्हटले आहे. तर काहींनी ही जोडी खूपच क्यूट दिसते, असे म्हटले.

रविंदर चंद्रसेकर हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. २०१३ मध्ये त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाउस लिब्रा प्रोडक्शन सुरू केले. ज्या अंतर्गत त्यांनी सुट्टा कढई सारखे चित्रपट बनवले. तर महालक्ष्मी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ती तमिळ चित्रपटांमध्येही काम करीत आहे. तिने व्हिडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

महालक्ष्मीने वाणी रानी, चेल्लामय, ऑफिस, अरासी, थिरु मंगलम, यामिरुक्का ब्यामेन आणि केलाडी कन्मणी यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहेत. त्याचबरोबर रवींद्र चंद्रशेखरने नलनाम नंदिनियम, सुट्टा कढाई, नटपुना एन्नानू थेरियुमा आणि मुरुंगकाई चिप्स या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Mahalakshmi, Ravindar Chandrasekaran Married News
Sidhu Moose Wala : मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित ताब्यात

अभिनेत्री महालक्ष्मीचे दुसरे लग्न

अभिनेत्री महालक्ष्मीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे अनिलसोबत लग्न झाले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगाही आहे. लग्नानंतर दोघांमध्ये खूप वाद झाले. त्यामुळे अभिनेत्री वेगळी झाली. आता तिला रविंदर चंद्रसेकरच्या रूपाने दुसरा पती मिळाला आहे. ‘विडियम वरई कथिरू’ चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली होती. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढत गेली.

लग्नावर काहींचा विश्वास बसे ना

लग्नाचे छायाचित्र समोर आल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नव्या जोडप्याला लग्नासाठी अनेक जण शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी अभिनेत्रीच्या अचानक लग्नाबद्दल काहींना विश्वास बसत नाही. पोस्टवर कमेंट करताना युजरने लिहिले की, हा काही मालिकेचा प्रोमो आहे का?. दुसऱ्याने लिहिले, हे कसे शक्य आहे?. तर एकाने लिहिले, आशा आहे की हा फक्त एक चित्रपट असावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com