Akola News : जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचीच अकोल्यात पोलिस तक्रार

प्रभू श्रीराम चंद्र यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अकोल्यातील जुने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
rajesh krupashankar mishra
rajesh krupashankar mishrasakal

अकोला - प्रभू श्रीराम चंद्र यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अकोल्यातील जुने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राकाँचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनीच ही पोलिस तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी जुने शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार शिर्डी येथील कार्यक्रमात ता. ४ जानेवारी रोजी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. संपूर्ण देशवासीयांच्या मनात प्रभू श्रीराम यांच्या विषयी प्रचंड आस्था आहे.

अयोध्या येथे श्रीराम यांच्या हक्काच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती, हे सर्वश्रुत आहे. प्रमुख श्रीराम यांच्या बद्दल आमच्या मनात आदर असून, त्यांच्या विषयी तीव्र भावना आहेत.

अशावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमच्यासह संपूर्ण हिंदू धर्माविषयी अभिमान बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे तातडीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेश मिश्रा यांनी केली आहे. ही तक्रार देताना नितीन मिश्रा, गजानन बोराळे, सुरेंद्र विसपुते, नितीन ताकवाले, योगेश गिते, देवा गावंडे, राजेश इंगळे, रुपेश ढोरे, गणेश बुंदेले, विजय तिखीले, रमेश पांडे, संजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com