

Akola News
esakal
अकोला: कॉ. पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातील दावे ऐतिहासिक पुराव्यांच्या पूर्णतः विपरीत असून या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने करीत आंदाेलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रखखत्या उन्हात समितीने निदर्शने करीत आपल्या मागण्या लावून धरल्या. यापूर्वी गत आठवड्यातही मनपा सभागृहाला दिलेले टिपू सुलतानचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले हाेते.