चिंता नको; शिवशंकरभाऊ पाटील उपाख्य भाऊसाहेबांची प्रकृती स्थिर

चिंता नको; शिवशंकरभाऊ पाटील उपाख्य भाऊसाहेबांची प्रकृती स्थिर

शेगाव (जि. बुलडाणा) : श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील (वय ८३) यांची प्रकृती मागील तीन ते चार दिवसांपासून चांगली नाही. मल्टीऑर्गन फेलीवरमुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. सद्यातरी शिवशंकरभाऊ यांची तब्येत स्थिर आहे. तेव्हा त्यांच्यासंदर्भात पसरविण्यात आलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन नातू हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चांगली नाही. ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असे त्यांनी म्हटल्यामुळे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एमडी मेडिसिन डॉ. हरीश सराफ हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देऊन आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह उपचार सुरू आहे. रक्तदाब कमी झाल्यामुळे शिवशंकरभाऊ पाटील यांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.

चिंता नको; शिवशंकरभाऊ पाटील उपाख्य भाऊसाहेबांची प्रकृती स्थिर
वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’

शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बुलडाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही बोलविण्यात आल्याची माहिती आहे. सद्यातरी शिवशंकरभाऊ यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यासंदर्भात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

उलटसुलट माहिती पसरवली

बुलडाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रकृतीबद्दल अनेक जणांकडून चौकशी केली जात आहे. काही ठिकाणी उलटसुलट माहितीही पसरवली आली. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या लोकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हृदयविकार असल्याने डॉक्टर्स उपचार करीत आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

चिंता नको; शिवशंकरभाऊ पाटील उपाख्य भाऊसाहेबांची प्रकृती स्थिर
व्वा! मोदीजी व्वा! तुमच्या राज्यात खासदार पण चूल वापरतायंत

कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊंची ख्याती

कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ पाटील यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शेगाव संस्थानचे व्यवस्थापन कित्येक वर्षांपासून अविरत सुरू आहे. शेगाव संस्थानचे समाजकार्य मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले. आनंद सागर हा भव्य प्रकल्प त्यांच्याच नेतृत्वात यशस्वीपणे राबविण्यात आला. संस्थानातर्फे सुरू असलेले इतर उपक्रम आजही यशस्वीपणे सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com