
अकोला : उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने त्याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. त्यामुळे वेळीच तपासण्या व उपचार करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. रक्तदाबाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी १७ मे रोजी साजरा होतो.