esakal | Video : अयोध्येतील राम मंदिरासाठी जाणार अकोल्यातून चांदीच्या विटा
sakal

बोलून बातमी शोधा

Silver bricks from Akola to go for Ram temple in Ayodhya

श्रीराम जन्मभूमीत भव्यदिव्य मंदिर उभे राहावे म्हणून अनेक दशकांपासून सुरू असलेला धार्मिक, कायदेशीर लढ्यानंतर अखेर मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य इच्छा असूनही अनेकांना लाभले नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अयोद्ध्येत हा सोहळा पार पडत असताना राजराजेश्वर नगरी अकोला राममय झाली होती.

Video : अयोध्येतील राम मंदिरासाठी जाणार अकोल्यातून चांदीच्या विटा

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अयोद्ध्या येथे बुधवारी(ता.५) पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण राजराजेश्वर नगरी राममय झाली होती.

राम नामात रंगलेल्या अकोल्यात ठिकठिकाणी आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. विधिवत पूजन करून लाडवाचा प्रसाद वितरित करण्यात आला. श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने राम मंदिराच्या बांधकामासाठी दोन चांदीच्या विट्या पाठवण्यात आल्यात.


श्रीराम जन्मभूमीत भव्यदिव्य मंदिर उभे राहावे म्हणून अनेक दशकांपासून सुरू असलेला धार्मिक, कायदेशीर लढ्यानंतर अखेर मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य इच्छा असूनही अनेकांना लाभले नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अयोद्ध्येत हा सोहळा पार पडत असताना राजराजेश्वर नगरी अकोला राममय झाली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विविध धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ४२ ठिकाणी होमहवण आणि पूजाअर्जा करण्यात आली. त्यानंतर लाडवाचा प्रसाद वितरित करण्यात आला. श्रीराम नवमी शोभयात्रा समितीच्या वतीने गोरक्षण रोडवरील नेहरू पार्क चौकातील खंडेलवाल भवन येथे धार्मिक अनुष्ठाण करण्यात आले.

राम मंदिरासाठी अकोल्यातील कारसेवक 11 दिवस होते स्थानबद्ध

समितीचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विलास अनासने, अशोक गुप्ता, गिरीश जोशी, सुनिता जोशी, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, नवीन गुप्ता, श्वेता गुप्ता, सत्यनारायण झवर यांच्या हस्ते पूजा-अर्चना झाली. यावेळी मनोज खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, अमित खंडेलवाल, वसंत बाछुका, डॉ. अभय जैन, डॉ. आनंद शर्मा, रामप्रकाश मिश्रा, अजय सिंग, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, वसंत खंडेलवाल, किशोर पाटील आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

अबब ! राम मंदिरासाठी त्यांनी तब्बल २३ वर्षे  घातली नाही पायात चप्पल

कार्यकर्त्यांना दिला पूजनाचा मान
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने अकोल्यातील खंडेलवाल भवनात होम करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पूजाअर्चा न करता कार्यकर्त्यांना पूजनाचा मान दिला.

मंदिरासाठी चांदीच्या विटा
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने बुधवारी अयोद्ध्या येथील राम मंदिराकरिता दोन चांदीच्या विटा तयार करून पाठविण्यात आल्यात. या विटांचे विधिवत पूजन करण्यात आले. राज्यातून मंदिरासाठी चांदीच्या विटा पाठवण्याचा पहिला मानही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीला मिळाला आहे. जिल्ह्यातून आणखी काही विटा पाठविण्यात येणार आहे.

ग्रुप ॲडमीनसाठी महत्वाची सुचना....राम मंदिर उभारणीचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त सोशल मीडियावर होतेय व्हायरल

भाजप कार्यालयात आतषबाजी
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप जिल्हा कार्यालयात सोहळ्याचे थेट प्रेक्षपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नेत्यांच्या भाषणानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत आतषबाजी केली आणि मिठाई वाटण्यात आली.

गर्दीत नियमांची पायमल्ली
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अकोला शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. भाजप कार्यालयातही मोठ्‍याप्रमाणावर गर्दी झाली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी धोकादायक ठरणारी होती. विषाणू संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले.
 
आतषबाजी करणाऱ्या युवकांना पिटाळले
न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये काही उत्साही युवकांनी एकत्र येत भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष करीत आतषबाजी केली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या युवकांना पिटाळून लावले.
(संपादन - विवेक मेतकर)