Ram Mandir : लाकडी खांबावर उभे असलेले कारंजातील कालाराम मंदिर

१८७६ साली स्थापना, अजूनही सुस्थितीत, राम सीता लक्ष्मणाच्या मनमोहक मूर्ती
since 1876 kalaram mandir culture significance 22nd jan lord ram pran pratishtha
since 1876 kalaram mandir culture significance 22nd jan lord ram pran pratishthaSakal

कारंजा : पोहा वेशीलगत पहाडपुऱ्यात मोठे राममंदिर असून याला कालाराम मंदिर सुद्धा म्हटल्या जाते. या मंदिरात राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. रामनवमीला सात दिवस या ठिकाणी महोत्सव साजरा केला जातो.

३० एप्रिल १८७६ मध्ये कारंजातील काण्णव परिवाराने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. १४८ वर्षापूर्वीचे हे मंदिर आजही सुस्थितीत आहे. गाभाऱ्यासमोरील सभामंडप लाकडी खांबावर उभा असून अजूनही सुशोभित दिसते.गाभाऱ्यात श्रीरामचंद्र प्रभू बाजूला सीता व त्यांचे बाजूला लक्ष्मण अशा तीन मुर्ती उभ्या आहेत.

कालाराम मंदिरात दरवर्षी रामनवमीला मोठा उत्सव राम मंदिर उत्सव समितीकडून आयोजित करण्यात येतो. यावेळी भागवत कथा, प्रवचन, कीर्तन या सोबतच दहिहंडी, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम संपन्न होतात. रामनवमीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते.

या दिवशी श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पहायला मिळते. लहान थोरांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वच दर्शनाचा लाभ घेतात. रामनवमीला मोठे राममंदिरापासून शहरातील मुख्य मार्गावरून श्रीरामचंद्र प्रभूंची भव्य शोभायात्रा निघते.

या शोभायात्रेत अनेक मंडळे सहभागी होऊन शोभायात्रेची शान वाढवितात. शोभायात्रा शिवाजीनगर, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा फुले चौक, रामा सावजी चौक, दत्त मंदिर अशी फिरून परत मंदिराजवळ येऊन विसर्जित होते.

सजावट, पूजन, होमहवनाचे आयोजन

२२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामप्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर कारंजात सुद्धा राम मंदिर उत्सव समितीच्या वतीने मोठे राम मंदिरात रोषणाई, मंदिर सजावट, पूजा, होम हवन मिठाई वाटप, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. दर्शनाच्यावेळी गर्दी होऊ नाही याकरिता राम मंदिर उत्सव समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समीर देशपांडे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com