नगरसेविकेसह सहा जणांवर टेंभुर्णीत फसवणुकीचा गुन्हा

आपत्य नसल्याचे पत्र व खोटे मृत्यु प्रमाणपत्र जोडून मृतकाच्या नावाने असलेल्या शेत जमिनी च्या सातबारा उताऱ्यावर नाव समाविष्ट करून फसवणूक
Six persons including corporator charges crime of fraud in Tembhurni Deulgaon Raja
Six persons including corporator charges crime of fraud in Tembhurni Deulgaon Rajasakal

देऊळगाव राजा : आपत्य नसल्याचे पत्र व खोटे मृत्यु प्रमाणपत्र जोडून मृतकाच्या नावाने असलेल्या शेत जमिनी च्या सातबारा उताऱ्यावर नाव समाविष्ट करून फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेतील महिला व बालकल्याण सभापती सह देऊळगाव राजा येथील सहा जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान आपल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्र बनविण्यास मदत करणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला चांगलेच अंगलट आले आहे. याबाबत टेम्भूर्णी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जालना येथील बाबुराव नागोजी सतकर हे मूळचे देऊळगावराजा येथील असून त्यांचे भाऊ रामचंद्र गंगाराम सतकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी धुरपताबाई रामचंद्र सत्कर ह्या सदर प्रकरणातील फिर्यादी बाबुराव  सतकर यांच्याकडे राहात होत्या त्यांचे पालन पोषण त्यांनीच केले.

धृपदाबाई त्यांचा मृत्यू जालना येथे सन १९९८ मध्ये झाला. जालना नगर परिषदेत ६ एप्रिल १९९८ रोजी रीतसर मृत्यूची नोंद करण्यात आली, व तसे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्यांचा अंत्यसंस्कार ही बाबुराव यांनीच केला. असे असताना संगणमत करून धुरपताबाई रामचंद्र सतकर यांच्या आपत्य नसल्याचे प्रमाणपत्र नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला बालकल्याण सभापती दीपमाला नवनाथ गोमधरे यांच्याकडून तयार करून घेऊन इतर बनावट कागदपत्रांचा वापर करून मौजे नांदखेडा तालुका जाफराबाद येथील १२ हॅकटर ०२ आर शेत जमिनीत देऊळगाव राजा येथील सतकर कुटुंबातील चार नावे लावून घेण्यात आली.

यासाठी टेंभुर्णी येथील तत्कालीन तलाठी ए एस पवार यांच्याकडून फिर तयार करून घेण्यात आला. तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी अविनाश पांडुरंग देवकर यांच्याकडून सदर फेर मंजूर करण्यात आला. या सर्व गैर कारभाराविषयी बाबुराव नागोजी सतकर राहणार जुना जालना यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी ताराबाई गोविंद सतकर, महेश गोविंद सतकर, विष्णु गोविंद सतकर, जितेंद्र गोविंद सतकर व दीपमाला नवनाथ गोमधरे राहणार देऊळगाव राजा यांच्यासह हे एस पवार तलाठी टेंभुर्णी यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रांच्या आधारे सातबारा फेर उताऱ्यात नाव नोंदविल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तदनंतर पालिकेच्या राजकीय वर्तुळात आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com