अकोला : जिल्ह्यातील ६१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषदेसाठी विक्रमी मतदान

अकोला : जिल्ह्यातील ६१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत

अकोला : जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या ६१ जागांसाठी मंगळवारी (ता. २१) मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत झाले. दरम्यान मतदानानंतर मतमोजणी बुधवारी (ता. २२) होणार आहे. अतिशय कमी जागांसाठी निवडणूक होणार असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच रिक्त जागेवरील निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये ४०३ पद रिक्त असल्याने त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम लागू करण्यात आला. पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ डिसेंबरपर्यंत ५२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.काही ग्रामपंचायतींमध्ये यावेळी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने अनेक जागा रिक्त राहिल्या तर काही ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान असले असले तरी ६१ जागांसाठी ४८ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (ता. २१) सकाळी ७ वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. बुधवारी (ता. २२) मतमोजणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

या ठिकाणी करण्यात येईल मतमोजणी

मतदानानंतर बुधवारी (ता. २२) मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होईल. तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर बार्शीटाकळी व पातूर तालुक्याची मतमोजणी तहसिल कार्यालयात करण्यात येईल, तर अकोला तालुक्याची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयाती शासकीय गोदामात करण्यात येईल.

टॅग्स :AkolaVoting