
Akola’s snake rescuer nurtured 12 snake eggs for 58 days, giving life to rare hatchlings.
esakal
-योगेश फरपट
अकोला: खामगाव रोडवरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या धामण सापाने दिलेल्या १२ अंड्यांमधून पिल्ले बाहेर काढण्यात अकोला जिल्हा सर्पमित्र एमएच३० ग्रुपचे सुरज इंगळे व अभय निंबाळकर यांना यश आले आहे. गेल्या ५८ दिवसांपासून या अंड्यांची योग्य काळजी घेऊन त्यांनी या सर्व धामण सापाच्या पिलांना जीवदान दिले आणि नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.