esakal | सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ, सुरुवातीलाच मिळतोय विक्रमी दर
sakal

बोलून बातमी शोधा

soybean

सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ, सुरुवातीलाच मिळतोय विक्रमी दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पातुर (जि. अकोला) : खरीप हंगामातील सोबायीन काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला माल आता बाजारात येऊ लागला आहे. पातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (patur apmc) सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ झाला असून, शुभारंभालाच सात हजार ८०० रुपये दर मिळाल्याने (soybean rate) शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा: एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!

एकीकडे नैसर्गीक आपत्तीत शेतकरी खरीपातील पीक जगविण्यासाठी धडपडत आहे. संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहे. असा निराशजन वातावरणातही आशेचा किरण सोयाबीन काढणीपासून दिसू लागला आहे. पातूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीतीत झाला. पातूर शहरातील शेतकरी ध्रृवकुमार उर्फ मोती देशमुख यांची सर्वप्रथम सोयाबीनची खरेदी झाली. शहरातील प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या शेतात सोयाबीन या पिकाची पेरणी जून महिन्यात पहिल्या पावसानंतर केली होती. त्यामुळे हे पीक मुदतीत व सर्वात अगोदर काढणीला आले होते. त्यामुळे त्यांना सोयाबीन हे पीक प्रती एकर सहा क्विंटल होऊन चांगली झडती मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्यांचे सोयाबीनला सर्वप्रथम विकण्याचा मान मिळाला. प्रती क्विंटल सात हजार ८०० रुपये एवढा भाव मिळाला. त्यांना चांगलाच फायदा यावर्षी झाला आहे. बाजार समितीच व्यवस्थापनाने त्यांचा दुपट्टा व टोपी घालून सत्कार केला. यावर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाचे आगमनाने सर्व वातावरण आनंदमय झाले आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तायडे, व्यापारी नीलेश पाटील, हरीश टप्पे, जुबेर खान, विनोद भालतिलक, उमेश थोटे, व शेतकरी वर्ग तसेच कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top