esakal | एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!
sakal

बोलून बातमी शोधा

soyabin market

एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तसेच निकृष्ट बियाणे निघाल्याच्या जिल्हाभरातून आठ हजार ३९ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यावर्षी मात्र, केवळ १३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही दिलासादायक बाब ठरली आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात खरिपात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. मात्र, दरवर्षी सुमार दर्जाच्या बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. बियाणे उगवले नसल्याचे किंवा बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याच्या तक्रारीचा भडिमार दरवर्षी कृषी विभागाकडे होत असल्याचे निदर्शनात येते. त्यापैकी काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते तर अनेकांना विविध कारणांनी भरपाई मिळत नसून, मोठा आर्थिक फटका बसतो.

हेही वाचा: विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे

गेल्यावर्षी देखील सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तसेच बियाणे निकृष्ट निघाल्याच्या जिल्हाभरातून आठ हजार ३९ तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मात्र, ही बाब गांभीर्याने घेत शासन स्तरावरून बियाणे उत्पादक कंपन्यांच्या चौकशीपासून ते उत्पादक व विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आली. त्यामुळे अल्पावधीतच निकृष्ट बियाणे विक्रीचा जोर कमी झाला आणि त्याचे फलित म्हणून यावर्षी नाममात्र म्हणजे जिल्हाभरातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या केवळ १३ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

घरचे बियाणे जोमदारच!

गेल्यावर्षी नामवंत कंपन्यांचे बियाणे निकृष्ट निघाल्याने व न उगवल्याने शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत बियाणे उपलब्धता कमी असल्याने कृषी विभागाकडून घरचे बियाणे पेरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी घरचेच बियाण्यांची पेरणी केली आणि जोमदार निकाल हाती आला. कोणत्याही भागात बियाणे न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे घरचे बियाणे जोमदारच, असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा: जेवण केल्यानंतर सुस्ती का येते? जाणून घ्या कारण...

गेल्यावर्षी बियाणे उगवले नसल्याच्या किंवा निकृष्ट निघाल्याच्या जिल्हाभरातून आठ हजार ३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर्षी मात्र, अद्यापपर्यंत केवळ १३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दहा केवळ पातूर तालुक्यातील असून, उर्वरित तीन तक्रारी इतर तालुक्यातील आहेत. या तक्रारींची दखल घेऊन कृषी विभागाद्वारे चौकशी करण्यात येत आहे.
- नितीन लोखंडे, गुणनियंत्रण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला
loading image
go to top