उमेदवारांना द्यावे लागेल हमीपत्र ; आरक्षित जागेवरून निवडणूक लढणाऱ्यांसाठी सूचना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

राज्यातील सुमारे चार जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अकोला : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे. निवडणुकीत आरक्षित जागेवरून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणापत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्र सादर करावे लागेल. ज्याच्याकडे जात पडताळणीचे प्रमाणपत्र आहे, त्यांच्यासाठी सदर आदेश लागू राहणार नाही, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

हे ही वाचा : आता ऑफलाईन होणार जिल्हा परिषदेच्या सभा ; ऑनलाईनला ब्रेक, सभा प्रत्यक्ष घेण्याचे सीईओंना आदेश

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे चार जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणुक लढणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती द्यावी लागेल. त्यासोबतच निवडून आल्यास १२ महिन्यांत प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्र सुद्धा द्यावे लागेल.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government has announced the program for the general elections of 225 gram panchayats in Akola district