esakal | मंगळवारपासून ‘आशां’चे काम बंद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

asha waorkers

आशा कर्मचाऱ्यांच्या सक्रीय सहभाग असलेल्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मध्ये आलेल्या त्रुटी व तातडीच्या मागण्या मान्य करण्याची मागणी या कृती समितीने अनेक मागण्या ठेवल्या आहेत.

मंगळवारपासून ‘आशां’चे काम बंद आंदोलन

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : जिल्हातील आशा व गटप्रवर्तक संघटना सीआयटीयुच्या आशा व गटप्रवर्तक यांच्या राज्यस्तरीय मागण्यासाठी १३ आॅक्टोबरपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

आशा कर्मचाऱ्यांच्या सक्रीय सहभाग असलेल्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मध्ये आलेल्या त्रुटी व तातडीच्या मागण्या मान्य करण्याची मागणी या कृती समितीने अनेक मागण्या ठेवल्या आहेत. त्यात शासन निर्णयानुसार आशा व गटप्रवर्तक यांना हॅडगोल्स, मास्क, टि-शर्ट व सर्व्हसाठी लागणारे साहित्य कुठे मिळाले तर कुठे नाही किंवा उशिरा मिळाले. त्यासाठी लागणारी टिमसुध्दा कुठे मिळाली तर कुठे मिळाली नाही.

'माझे कुटूंब माझी जबाबदारी'च्या सर्वेक्षणाचे काम आशा स्वयंसेविका करत असतांना त्यांनी मिळविलेल्या माहितीच्या संकलनाचे रिपोर्टिंगचे काम ग्रामपंचायत पासून शहरी भागापर्यंत डाटा ऑपरेटरकडून किंवा तत्सम कर्मचाऱ्यांकडून करुन घ्यावेत.
 
हे ही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरात! 

त्यासाठी आशा स्वयंसेविका किंवा त्यांच्या कुटूंबीयांवर सक्ती करु नये. तसेच कामाचा दर्जा राखत रोज ५० गृहभेटी व इतर नियमित काम करत असतांना आशा स्वंयसेविकांची दमछाक होत आहे. तरी एकंदरीत प्रतिदिन ८ ते १० तास कामाऐवजी प्रतिदिन चार ते पाच तास काम, गटप्रर्वतकांना मिळणारा मासिक भत्ता रुपये ६२५ करणे 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मध्ये गटप्रर्वतकांकडे नियमित आढावा व दररोज रिपोर्टिंगचे काम सोपविले आहे. तरी त्यांनाही दैनिक प्रोत्साहन भत्ता मिळावा. महानगर पालिकेतील आशा कर्मचाऱ्यांना रुपये ३०० प्रतिदिन कोविडच्या कामाविषयी भत्ता मिळत असल्याने 'समान काम समान वेतन' या तत्वाच्या आधारे ग्रामीण व नागरी आशा स्वंयसेविकांना रुपये ३०० भत्ता लागू करावा.

हे ही वाचा : सत्ताधारी-विरोधकांचे आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष 

कोविड - १९ चे काम करत असतांना शेकडो आशा स्वंयसेविका बाधित झाल्या आहेत व काहींचे मृत्यू देखील झाले आहेत. मृत आशांच्या घरातील कुटूंबीय बाधित होऊन त्यांना आर्थिक झळ बसली आहे. मृत आशांना विम्याचा मोबदला व बाधित आशा व गटप्रर्वकांना वैद्यकीय खर्चासाठी किमान २५ हजार रुपये मदत जाहीर करावी. जिल्हात काही ठिकाणी काम करतांना आशांना शिवीगाळ व मारठोक सारख्या तक्रारी समोर आल्या, त्यासाठी अशा कामगांराच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर आहे. त्याबाबत प्रशासनाने व राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन सुरक्षा कायदा अंमलात आणून, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अश्या मागण्या समितीने केल्या आहेत.

या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर १३ ऑक्टोबर २०२० पासून मागण्यासाठी नाईलाजास्तव कृति समितीला याबाबत तीव्र आंदोलन व संपही करण्याचा इशारा राज्य महासचिव सलीम पटेल, सहसचिव नेत्रदीपा पाटील, अकोला जिल्हा सचिव संध्या पाटील, कोषाध्यक्ष रुपाली धांडे, उपाध्यक्ष संतोष चिपडे, राजन गावंडे, कार्यकारी सदस्य मिना जवंजाळ, उज्जवला डोबाळे, कविता डोंगरे, मिना वानखडे, कालिंदा देशमुख यांनी केला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले