शालेय पोषण आहाराचे थकीत वेतन मिळावे ; शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

A statement has been issued to get the salary of the employees who have been cooking school nutrition food for 11 months..jpg
A statement has been issued to get the salary of the employees who have been cooking school nutrition food for 11 months..jpg
Updated on

मेहकर (बुलडाणा ) : शहरातील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनाद्वारे मागील ११ महिन्यापासून थकलेले शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचार्‍यांचे वेतन मिळावे, यासाठी निवेदन दिले आहे.

किराणा दुकानात एक लाखाची चोरी; मोताळा शहरातील घटना, गुन्हा दाखल
 
मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा तसेच खाजगी संस्थेमध्ये मेहकर तालुक्यातील शालेय पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना नियमित वाटप करण्याचे काम या महिला कर्मचारी करत आहेत. मात्र मागील ११-१२ महिन्यांपासून त्यांचे वेतन न मिळाल्याने संबंधित अधिकार्‍यांना वारंवार विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. यात महत्त्वाचे असे की ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांना शालेय पोषण आहाराचे वेतन मिळालेले आहे. मात्र तालुकास्तरावरील शहरातील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचार्‍यांचे वेतन अद्यापपर्यंत मिळालेले नाही. 

कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच हाताची कामे कमी झाले आहेत. यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे? असा यक्षप्रश्न उभा असतानाच मागील सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे वेतन थकलेले आहे. यामुळे मागील थकलेले वेतन त्वरित मिळावे, यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन दिले आहे. यावर रेखा गवई, भारती देशमाने, शोभा तुरुक, नीलू देशपांडे, कुसुम कल्याणकर, नाजेमा बी सौ सादिक यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com