
अकोला : महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
अकोला : विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी साेमवारपासून (ता. ४) बेमुदत संपाला सुरूवात केली आहे. सदर संपात जिल्हाधिकारी कार्यालयातील २९० कर्मचारी सहभागी झाल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले. संपादरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सुद्धा दिले.
राज्यात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका महसूल सहाय्यकाकडे २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाच ताण वाढत आहे. त्यामुळे महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी. याव्यतिरिक्त विविध मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरवा करूनही केवळ आश्वासन मिळत आहे. या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करावे लागत असल्याची खंत कर्मचारी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या टप्प्यात सोमवारपासून (ता. ४) जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला.
त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागात काम न करता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे दिले. धरणे आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वैजनाथ कोरकणे, सचिव संतोष कुटे, कोषाध्यक्ष सचिन भांबेरे, कार्याध्यक्ष मंगेश पेशवे, नितीन निंबुळकर, उपाध्यक्ष संतोष इंगळे, दिनेश सोनोने, अभय राठोड, अविनाश डांगे, विशाल ढाकरगे, बी.टी. चव्हाण, संजय इसाटकर, मनोज मानकर, नामदेव राठोड, योगेश खांदवे यांच्यासह महिला प्रतिनिधी ज्योती नारगुंडी, रत्ना बाजारे, वर्षा भुजाडे, वंदना वानखडे, उमा गावंडे, संध्या ठाकरे व इतरांची उपस्थित होती.
२०९ कर्मचारी संपात सहभागी
जिल्हाधिकारी कार्यालयात गट ‘क’चे २४३ व गट ‘ड’चे ६६ असे एकूण ३०९ कर्मचारी आहेत. त्यापैकी संपात गट ‘क’चे २२६ आणि गट ‘ड’चे ६४ असे २९० कर्मचारी सहभागी झाले. याव्यतिरिक्त गट ‘क’चे १० कर्मचारी संपानंतर सुद्धा कार्यालयात उपस्थित होते.
कामकाज खोळंब
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश विभागात शुकशुकाट पहायला मिळाला. काही विभाग खुले असल्यानंतर सुद्धा त्यामध्ये कर्मचारी अनुपस्थित होते.
Web Title: Strike Of Revenue Employees Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..