
अकोला : महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चिघळणार
अकोला : जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी ता. ४ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व अकोला जिल्हा महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपाचा बुधवारी (ता.६) तिसरा दिवस होता. अद्याप सरकारने संपांची दखल घेतली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.
महसूल संघटनेतील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकरिता हा संप पुकारला आहे. त्यात राज्यातील महसूल विभागात महसूल सहायक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, ही पदे तत्काळ भरण्यात यावी. अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासन निर्णय महसूल व वन विभाग ता. १० मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय सवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्वल कारकून/मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तत्काळ रद्द करावे.
अनुकंपा नोकरभरती करावी. ता. १४ जानेवारी २०१६ रोजीचे शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पदोन्नती २५ टक्के वरून ५० टक्के करण्यात आली; परंतु महाराष्ट्रात पदोन्नती ९० टक्के दिली गेली. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे निरसित करू नये. कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी पदोन्नतीमध्ये कोटा ४० टक्के केला. पण महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली गेली नाही. ती त्वरीत मिळावी. शिपाई/लिपीक/तलाठी यांची शैक्षणिक अर्हता पदवीधर केली आहे. शिपाई व लिपीकाचे वेतन तलाठी प्रमाणे समान करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. या संपात बुधवारी (ता.६) तिसरा दिवस होता. अद्यापपर्यंत सरकारने मागण्यांचा विचार केला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
या संपामध्ये अकोला महसूल कर्मचारी संघटना अकोला अध्यक्ष वैजनाथ कोरकने, सचिव संतोष कुटे, राज्य समन्वय समिती उपाध्यक्ष राजेंद्र नेरकर, कोषाध्यक्ष सचिन भांबेरे, कार्याध्यक्ष मंगेश पेशवे, नितीन निंबोलकर, संतोष शिंदे, भूषण बोर्डे, आर. एफ. राठोड, संतोष इंगळे, अभय राठोड, संतोष अग्रवाल, प्रशांत देशमुख, पंकज दुबे, शशिकांत फासे, मनोज वाडेकर, राहुल राठोड, गणेश राठोड, मोहन साठे, गणेश ठोंबरे, वर्षा भुजाडे, वनिता मडावी, वंदना वानखडे, संध्या ठाकरे, उमा गावंडे, भाग्यश्री चौधरी, ज्योती नारगुंडी, उज्ज्वला सांगळे, शुभेच्छा पाटील, शिल्पा राऊत, दीपिका केदार, प्रेमा हिवराळे, नीलेश दामोदर, अवी डांगे, शशी देशपांडे, परमेश्वर बोपटे, दीपक बढे, उमेश गावंडे, योगेश खांदवे, संजय तिवारी, प्रमोद घोगरे, दिलीप रुदरकर व समस्त चतुर्थ श्रेणी व अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटना कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Strike Of Revenue Employees Update Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..