जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे विमानाद्वारे सर्व्हेक्षण; चित्रीकरण करीत केली हवाई पाहणी 

A survey of bullet trains by air is underway in Buldana district :
A survey of bullet trains by air is underway in Buldana district :

सिंदखेड राजा (बुलडाणा) : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणार्‍या रस्ते महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी काम हे अंतिम टप्प्यात असून, यापुढे मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ काही तासांमध्ये पार करता येणार आहे. समृद्धी महामार्ग सोबतच शासनाकडून मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे.

१६ मार्चला सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान, जिल्ह्यात हवाई पाहणी करण्यात आली. मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनसाठी लिडार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ७३६ किमी अंतराच्या या सर्वेक्षणाचे काम शुक्रवारी ठाण्यात सुरू झाले. ते अमरावती, अकोला मार्गे मुंबईपर्यंत करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचे सुद्धा हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा वीज खांबावर मृत्यू; दुरुस्तीचे काम करताना लागला शॉक 
 
अकोला येथून एक विमान उडून ते विमान जालना जिल्ह्याच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून अंदाजे ३०० मीटर उंचीवरून उड्डाण घेत बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील जाणार्‍या समृद्धी महामार्गाचे हवाई चित्रीकरण करीत जालना येथून परत कारंजाकडे निघून गेले. त्यानंतर १७ मार्चला नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. ७३६ किमी अंतराच्या या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा, मालेगाव , मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी आणि शहापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. त्या कामाला तातडीने सुरवात करण्याच्या दृष्टीने ही हवाई चित्रीकरण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे (एनएचएसआरसीएल) करण्यात येत आहे. 

लिडार सर्वेक्षणमध्ये विमानाला लिडार आणि फोटो किंवा शहरे व्हिडिओ घेणारे सेन्सर्स लावलेले आहेत. हे विमान हवेतून प्रस्तावित कॉर्पोरेशनचे मार्गाचा लाइट डिटेक्शन ऍण्ड रेजिंग पॅकेज सर्व्हे म्हणजे लिडार सर्व्ह करते. ते त्यात प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आजु बाजूचे १५० मीटर पर्यंतचे प्रदेशाचे चित्रीकरण केले गेले. त्यासाठी विमानाला १०० मेगा मिक्सल क्षमतेचा कॅमेरा वापरण्यात आला होता. या चित्रिकरनाद्वारे त्रिमिती म्हणजे थ्रीडी नकाशा तयार केला जातो. त्यामध्ये त्या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या डोंगर, झाडे, जमिनी, इमारती इत्यादी गोष्टी लांबी, रुंदी, उंचीनुसार त्रिमिती नकाशात दिसणार आहे. ही सर्व माहिती संकलित केल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

भारत सरकारने नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडला सहा मार्गावर सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मुंबई ते नागपूर मार्गावर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. १५ ला नाशिक ते जालनापर्यत सर्वेक्षण पूर्ण केले होते. कारंजा ते जालनाच्या काही भाग सर्वेक्षण करण्याचा राहिला होता. ते सर्वेक्षण १६ मार्चला पूर्ण केले. अकोला येथून उड्डाण करून जालना पर्यत सर्वेक्षण पूर्ण केले आहे. १७ मार्चला अकोला येथून नागपूरचे सर्वेक्षण करण्यासाठी निघणार आहे. हवाई सर्वेक्षण सोबतच परत एक सर्वेक्षण सुरू आहे ते म्हणजे नागरिकांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांचे मत घेतले जात आहे. त्या ठिकाणीचे स्थानिक नागरिक बुलेट ट्रेनने प्रवास करू शकतात का? बुलेट ट्रेनचे तिकीट किती असावे, सध्या मार्गावरून किती वाहतूक सुरू आहे. कार, बस, रेल्वे, विमानाने किती नागरिक प्रवास करताना याचा रिपोर्ट घेणे सुरू आहे. तो लवकरच आम्हाला मिळणार आहे. सर्व माहितीचे संकलन करून यावर्षी भारत सरकारला रिपोर्ट सादर करणार आहे. 
- पंकज उके, महाव्यवस्थापक (ऑपरेशन), नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com