
अकोट (जि.अकोला) ः मुंडगाव येथील २२ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडला करण्यात ग्रामीण पोलिसांना (Rural Police) यश आले. जेठाणेच विवाहितेची हत्या (Murder of a married woman) केल्याचे सिद्द झाले आहे. मृतक विवाहितेचा जेठ संतोष ज्ञानदेवराव सदार (३२) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडीत दिली आहे. Suspected death of a married woman in Mundgaon revealed
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नात्यातील एकाच मृत्यू झाल्याने घरची सर्व मंडळी गावातच निघून गेली होती. यावेळी निकिता एकटीच मुंडगाव येथील आपल्या सासरी राहली. अंत्यविधी उरकल्यानंतर आरोपी संतोष सदार हा त्याच दिवशी अत्यंविधी कार्यक्रम निपटून पटकन घरी परतला.
आरोपीचा निकितावर वाईट नजर होती,आरोपीने पंधरा दिवस अगोदरही तिला ‘मला तू खूप आवडते’ म्हणून तगादा लावयाचा; मात्र निकीताने याविषयी आरोपीला विरोध केला, व घरच्यांना याबाबत सर्व हकीकत सांगणार असल्याचे म्हटले. घरच्यांसमोर आपले बिंग फुटणार म्हणून निकीताला आयुष्यातून उठविण्यासाठी आरोपी संतोष ज्ञानदेवराव सदार याने दोरी टाकून तिचा गळा आवळला व निकीताचा फिट येऊन मृत्यू झाल्याचा खोटा बनाव करून आरोपातून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
निकीताच्या घरच्या मंडळींना फोन करून याबाबत अवगत करण्यात आले. मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच माहेरच्या लोकांनी मुंडगाव गाठले, मात्र मुलीचा मृतदेह आणि जेठ करीत असलेला बनाव बघून माहेरच्यांना संशय आला. आपल्या मुलीचा फिट येऊन नव्हे तर सासरच्या मंडळींनीच हत्या केल्याचा संशय होता. इकडे सासरच्या लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी करायला सुरुवात केली; मात्र जोपर्यत मुलीचा मृत्यू कशामुळे झाला हे निष्पन्न होत नाही तोवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची माहेरच्यांनी भूमिका घेतली. यावेळी सदर घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्याच्या सूचना दिल्या, ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी प्रथमदर्शी तपास केला असता मृतक निकीताच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या,मृतकाच्या गळ्याभोवती असणाऱ्या जखमा, घटनास्थळी पाहणी, आणि आरोपीच्या जबाणीत विसंगती दिसून आल्याच्या संशयावरून अखेर पोलिसांनी आरोपीचा सुगावा लागला आरोपी संतोष ज्ञानदेवराव सदार रा.मुंडगाव याला न्यायलया समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धर्माजी डाखोरे करीत आहे.
संपादन - विवेक मेतकर
Suspected death of a married woman in Mundgaon revealed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.