तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू, शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय

तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू, शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय
तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू, शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय
Updated on

बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील हातरुण - कारंजा (Hatrun-Karanja) रस्त्यावरील शेतशिवारात तीन मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आलेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. वन विभागाने या तीनही मोरांच्या मृत्यूची (Death) नोंद घेतली असून, या मोरांचा मृत्यू कशामुळे झाला याची तपासणी वनविभागाकडून करण्यात येत आहे. (Suspicious death of three peacocks, suspected attempt of poaching)

बुधवारी सकाळच्या सुमारास हातरुण-कारंजा रमजानपूर शेतशिवारात तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे घटनेची माहिती हातरुण येथील आशिफ शहा यांनी उरळ पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार, बिट जमादार विजय झाकर्डे, वाहतूक पोलिस किशोर पाटील, पद्यसिंह बयस, पोलिस पाटील संतोष बोर्डे व वन कर्मचारी जी.डी. इंगळे, वनरक्षक जी.पी.घुडे घटनास्थळी हजर झाले. कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत मोर ताब्यात घेतले.

तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू, शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

मोरांच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय

या परिसरात मोरांची संख्या जास्त आहे. वन्यप्राणी आणि पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने शिकारीही याच भागात घुटमळतात. हातरूण ते शिंगोली दरम्यान पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली असून अनेक ठिकाणी पाईप फुटल्यामुळे त्यामधून गळती होत असल्याने याठिकाणी डबके साचले आहे. पाण्याच्या शोधार्थ आलेल्या मोरांना तुर किंवा मक्याच्या दाण्यांना विषारी पदार्थ लाऊन किंवा विषारी औषध पाण्यात टाकून मोरांची शिकार केली जात असल्याची चर्चा आहे.

तीन मोरांचा संशयास्पद मृत्यू, शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय
काँग्रेसचे अनिल पाटील काळाच्या पडद्याआड

वन्यप्राण्यांची मांस विक्री

या परिसरात मोर व वन्यप्राण्यांच्या मांसाची मागणी आहे. त्यामुळे मोरांच्या शिकारीचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान वन विभागाने याबाबत अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. केवळ मृत मोरांची तपासणी झाल्यानंतरच खरा प्रकार पुढे येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र शिकारीचा प्रयत्न की बर्ड फ्लू हे स्पष्ट झालेले नाही. पशुसंवर्धन, वन विभागाने मोरांच्या मृत्यूचे कारण शोधावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Suspicious death of three peacocks, suspected attempt of poaching

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com