पतंग उत्सव साजरा करताना पक्षांची काळजी घ्या : जिल्हाधिकारी नीमा अरोरा

जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी ‘सेव्ह बर्डस अकोला’ संस्थेचा पुढाकार
akola collector
akola collectorsakal media

अकोला : पतंगोत्सवा दरम्यान अथवा एरवीही जखमी पक्षी आढळल्यास अशा पक्षांना सेव्ह बर्डस अकोला या संस्थेमार्फत सुश्रुषा व उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे मकर पतंग उत्सव साजरा करताना आकाशात उडणारा एखाद पक्षी जखमी झाल्यास संस्थेकडे सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आले आहे.

akola collector
जळगाव महापालिकेची एकाच दिवसात दीड कोटी रुपयांची घरपट्टी वसुली

यासंदर्भात जिन आज्ञा ग्रुप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री व वापरास मनाई असून त्यामुळे माणसांना व आकाशात विहारणाऱ्या पक्षांना गंभीर इजा होऊन नुकसान होते. शिवाय अनेक पक्षांना प्राणास मुकावे लागते. तथापि, पतंग उडविण्याच्या मकर संक्रांतीच्या पर्वात पक्षांच्या जखमी होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच माणसांनाही नायलॉन मांजाच्या वापरामुळे गंभीर दुखापत होत असल्याच्या घटना घडत असतात.

नायलॉन मांजामुळे पतंग उडविताना आकाशात विहारणारे पक्षी तसेच तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जखमी होत असतात. अशा जखमी पक्षांना ‘सेव्ह बर्डस अकोला’ या संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. त्यासाठी त्यांच्या हेल्पलाईक क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधितांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com