जळगाव महापालिकेची एकाच दिवसात दीड कोटी रुपयांची घरपट्टी वसुली

अभय योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद
जळगाव महापालिकेची एकाच दिवसात दीड कोटी रुपयांची घरपट्टी वसुली

जळगाव : महापालिकेतर्फे मालमत्ता थकबाकी अभय योजनेंतर्गत मंगळवारी (ता. १४) एका दिवसात तब्बल १ कोटी ५६ लाख ९५ हजार ९५६ रूपये वसूल करण्यात आले आहे, नागरिकांकडून या योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास ९० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.

जळगाव महापालिकेची एकाच दिवसात दीड कोटी रुपयांची घरपट्टी वसुली
क्रेडाई सोलापूरच्या वतीने प्रॉपर्टी एक्‍स्पोचे आयोजन

तसेच २२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान थकबाकीचा भरणा केल्यास ७५ टक्के शास्ती माफ केली जाणार असून ६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान, थकबाकी भरल्यास ५० टक्के शास्ती माफ केली जाणार आहे.या योजनेतर्गत तब्बल आठ हजार लोकांनी लाभ घेतला असून आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख ६८ हजार १६७ रुपये इतका भरणा झाला आहे. यामध्ये प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये १ कोटी ७९ लाख ५५ हजार ४२ रुपये इतकी वसुली झाली असून प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये १ कोटी ८४ लाख ९४ हजार २१६ रुपये तर, प्रभाग समिती क्रमांक तीनमधून १ कोटी ८३ लाख २२ हजार ३४० रुपयांची व प्रभाग समिती क्रमांक चारमधून १ कोटी २७ लाख ९६ हजार ५६९ रुपये इतकी वसुली झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com