पावसाळ्यात वीज यंत्रणांची 'अशी' घ्या काळजी

वीज ग्राहकांनी सावधता बाळगूण संभाव्य अपघात टाळावे
Electric system
Electric systemSakal

अकोला - पावसाळा सुरू होताच वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या तुटून वीज प्रवाह खंडित होणे किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. सोबतच घरगुती वीज उपकरणे आणि वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधीकधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालया अवगत करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अशी घ्या खबरदारी

  •  पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येऊ देऊ नका.

  •  घरातील वीजपुरवठ्याला अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.

  •  घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तत्काळ बंद करावा.

  •  दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.

  •  ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.

  •  विजेच्या उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

  •  विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे.

  •  विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत.

  •  खांबांना दूचाकी टेकवून ठेऊ नयेत.

  •  विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

वीज ग्राहकांसाठी २४ तास कॉल सेंटर

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉलसेंटर्सचे 1912,1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com