esakal | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास
sakal

बोलून बातमी शोधा

jail

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील हिवरखेड येथील अल्पवयीन मुलगी शेतात जनावरे चारण्यासाठी गेली असता, तेथेच राहणारा विलास नारायण तायडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याच्या आरोपात जिल्हा व सत्र न्यायालय, अकोटचे न्यायाधीश चकोर बाविस्कार यांच्या न्यायालयाने आरोपीस कलम ३७६ (१), ३७६ (२), (जे) ३७६ (३) आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ५ (एम) सह ६ या कलमांतर्गत आरोपीला नैसर्गिक जीवनाच्या अंतापर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा: Monsoon Update| महाराष्ट्रातला मॉन्सून संपला; आता थंडीची चाहूल

या शिक्षेबरोबर ३० हजार रुपयाचा द्रव्यदंडही न्यायालयाने ठोठावला. दंड न भरल्यास तीन वर्ष अधिकचा कारावसाची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. त्याचप्रमाणे भादंविच्या कलम ३२३ कलमांतर्गत आरोपीस एक वर्षाचा कारवासाची शिक्षा व एक हजार रुपये द्रव्यदंड ठोठावला आहे. आरोपीने दंड न भरल्यास त्याला तीन महिने अधिकचा कारावास भोगायचा आहे.

या प्रकरणी ३० ऑगस्ट २०१७ रोजी घडलेल्या घटनेत पीडितेने हिवरखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. पीडितेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी विलास नारायण तायडे याच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (आय) (जे) (एम), ३२३ भादंवि व कलम ५ (एम) सहकलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. हिवरखेड पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.

न्यायालायत २१ जणांची साक्ष यावेळी तपासण्यात आली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकूण श्री. चकोर बाविस्कार यांच्या न्यायालयाने आरोपीला नैसर्गिक जीवनाच्या अंतापर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता जी.एल.इंगोले यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस.भस्के, पो.हे.काँ. राजेश भगत यांनी तपास केला.

loading image
go to top