esakal | तेल्हारा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2771घरकुल मंजूर; रेती अभावी बांधकाम रखडणार
sakal

बोलून बातमी शोधा

In Telhara taluka, 2771 houses have been sanctioned under Pradhan Mantri Awas Yojana

तेल्हारा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2771घरकुल मंजूर झाले असून यामध्ये इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना 2675 तर 76अ जाती तर 20अ जमाती साठी घरकुल मंजूर करण्यात आले आहे.

तेल्हारा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2771घरकुल मंजूर; रेती अभावी बांधकाम रखडणार

sakal_logo
By
सदानंद खारोडे

तेल्हारा (अकोला ) : तेल्हारा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात सन 2020-2021करिता 2771 घरकुल मंजूर झाले आहे. तरी घर बांधकामासाठी रेती नसल्याने गरिबांच्या घराचे स्वप्न भंगणार होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : ‘गाव तेथे पाटी’, गावकऱ्यांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न 

तेल्हारा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2771घरकुल मंजूर झाले असून यामध्ये इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना 2675 तर 76अ जाती तर 20अ जमाती साठी घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ज्या लाभार्थीचे घरकुल मंजूर झाले त्यांची कागदपत्रे ग्रामपंचायतीने जमा करून आपले जुने घर पाडून नवीन बांधकामासाठी जागा तयार करून नवीन बांधकाम होईपर्यंत लाभार्थ्यांनी उघड्यावर संसार थाटला आहे.

मात्र शासनाने तालुक्यातील एकही रेती घाट हर्रासि न केल्याने आता बांधकाम करावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदी पात्रातील रेती बांधकामासाठी आणले तर महसूल विभागाने कारवाई करित असल्याने गरिबांच्या मंजूर झालेले घर होणार कसे? याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. अकोला जिल्ह्यातील पालकमंत्री तथा गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारे बच्चू कडू यांनी लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

हे ही वाचा : यंदाची चित्रकला परीक्षा अधांतरी, दहावीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घटण्याची शक्यता

शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होईल तसे निर्देश तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्याप्रमाणे रेती उपलब्ध करून देतील.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला 

माझे घरकुल पंतप्रधान योजनेंतर्गत मंजूर झाले आहे. मात्र, रेती नसल्याने बांधकाम करावे तरी कसे. 
- प्रमोद खारोडे, तळेगाव बाजार

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image