अकोला : पॉझिटिव्ह रुग्ण संख्येची गती वाढली!

गुरुवारी २८४ रुग्ण; १४७ रुग्ण अकोला शहरातील
corona news akola
corona news akolaSakal media
Updated on: 

अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (akola corona update)संख्या दुपटीने वाढत आहे. गुरुवारी प्राप्त अहवालांपैकी २८४ रुग्णांचे अहवाला पॉझिटिव्ह आलेत. त्यात अकोला शहरातील १४७ रुग्णांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६९३ अहवाल प्राप्त झाले. त्यात २२४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. खाजगी लॅबमधून सहा असे एकूण २३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान, काल (ता.१२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ५४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे एकूण पॉझिटिव्ह २८४ रुग्ण आढळलेत. आरटीपीसीआर(Rtpcr) अहवालात ८० महिला व १४४ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १४७ जण हे अकोला शहरातील, अकोट तालुक्यातील १९ जण, मूर्तिजापूर येथील ३१, अकोला ग्रामीण येथील पाच, बार्शीटाकळी येथील सहा, बाळापूर येथील सात, पातूर येथील दोन, तेल्हारा येथील सात रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.(The number of positive patients increased in akola )

corona news akola
‘महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत निर्बंध राहतील’

३६ जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

९८३ वर उपचार सुरू

गत दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ९५ टक्के रुग्ण हे होम आयशोलेशनमध्ये आहेत. या महिन्याच्या १ तारखेला पाच रुग्ण होते. १३ दिवसांत रुग्ण संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com