दुसरा डोस मिळणार, १८ हजार ७१० लशी उपलब्ध

कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्यांचा मार्ग सुकर
दुसरा डोस मिळणार, १८ हजार ७१० लशी उपलब्ध

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या(Corona preventive vaccine) तुटवड्यामुळे लसीचा दुसरा डोस न मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून सोमवारी (ता. १०) रात्री कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीनचा साठा (Covishield and covacin stocks) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्डच्या ९१०० व कोव्हॅक्सीनच्या ९१० लसींचा समावेश आहे. परिणामी कोव्हिशिल्ड लसींचा दुसरा डोस घेणाऱ्यांना या साठ्‍यामुळे दिसाला मिळणार असला तरी कोव्हॅक्सीनचा अल्प साठा मिळाल्याने त्याचा तुटवडा आहेच. याव्यतिरिक्त १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून ८ हजार ७०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. The second dose will be available, 18 thousand 710 vaccines available

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

दुसरा डोस मिळणार, १८ हजार ७१० लशी उपलब्ध
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. असे असले तरी जिल्ह्याला कोरोना लशींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. त्यामुळे पहिला लस घेतलेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत असून अनेक लाभार्थी लसीकरणासाठी वाट पाहत आहेत. परंतु शासनामार्फत मात्र अल्प लसींचा पुरवठा करण्यात येत आहे.

दुसरा डोस मिळणार, १८ हजार ७१० लशी उपलब्ध
एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

तरुणांसाठी मिळाले ८७०० डोस

जिल्ह्यासह राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेत १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. या वयोगटातील लसींचा पुरवठा राज्य शासनाकडून करण्यात येत असून जिल्ह्यासाठी सोमवारी (ता. १०) रात्री ८ हजार ७०० कोव्हिशील्डचे डोस मिळाले.

अल्प पुरवठ्‍यामुळे पुन्हा खोळंबणार लसीकरण

जिल्ह्यासह राज्यातील ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र शासनामार्फत लसींचा साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर साठा अल्प प्रमाणात मिळत असल्याने लसीकरण मोहिमेत नेहमीच खंड पडत आहे. दरम्यान सोमवारी (ता. १०) सुद्धा केंद्र शासनाकडून (राज्यामार्फत) मिळालेल्या लसींच्या साठ्यापैकी ९ हजार १०० कोव्हिशील्ड व ९१० कोव्हॅक्सीनचे केवळ डोस मिळाले. सदर साठा जास्तीत जास्त तीन दिवसांचा असल्याने मोहिमेत पुन्हा खोळंबा निर्माण होणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

The second dose will be available, 18 thousand 710 vaccines available

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com