अकोला : सांस्कृतिक भवनाला वाढीव निधीचा ‘टेकू’ ; महिन्याभरात पुन्हा सुरू होणार काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : सांस्कृतिक भवनाला वाढीव निधीचा ‘टेकू’ ; महिन्याभरात पुन्हा सुरू होणार काम

शिल्लक निधीत डीपीसीतून पालकमंत्र्यांचा वाढीव पुरवठा

अकोला : सांस्कृतिक भवनाला वाढीव निधीचा ‘टेकू’ ; महिन्याभरात पुन्हा सुरू होणार काम

अकोला : शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारे भव्य सांस्कृतिक भवन मंजूर होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून झालेल्या अर्वधट कामानंतरही साडेपाच कोटीचा निधी शिल्लक होता. मात्र, अंतर्गत राजकारणात भवनाचे काम रखडले. या रखडलेल्या प्रकल्पावर जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू(guardian minister bacchu kadu) यांनी वाढीव निधीचा ‘टेकू’ दिल्याने आता ७.२१ कोटीच्या निधीतून नव्याने उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.

हेही वाचा: अकोला : ‘शिवभोजन’वर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच!

अकोला शहराच्या(akola city) मध्यवर्ती भागात येणाऱ्या रामदासपेठेतील क्रीडा संकुलच्या एक लाख २९ हजार चौ. फूट जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. भवनाचे ८0 टक्के काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटले. शासनाने दिलेल्या १५ कोटीतून ९.५ कोटी रुपये भवनाच्या निर्माण कार्यावर खर्च झाले. ५.५ कोटीचा निधी शिल्लक होता. परंतु निधी नसल्याने कंत्राटदाराने काम अर्धवटर्ध सोडत असल्याची ओरड करून गाशा गुंडाळला. त्यामुळे सांस्कृतिक भवनाचे काम रखडले. लोकप्रतिनिधींनीही या भवनाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याचे सांगून रखडलेले काम शिल्लक निधीतून पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी निधी असूनही सांस्कृतिक भवनाच्या भव्य इमारतीचे ‘फिनिसिंग’ होऊ शकले नाही.

हेही वाचा: राजमाता माँ साहेब जिजाऊ महिला विद्यापीठासाठी ‘बारामती’तून बळ

साडेसात कोटीचे नव्याने अंदाजपत्रक सन २०१६ मध्ये शासनाने १५ कोटी रुपये दिल्यानंतर सांस्कृतिक भवनाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर नांदेडच्या कंपनीने ९.५ कोटी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण केले. सांस्कृतिक भवनासाठी शासन ५० टक्के तर महानगरपालिकेला ५० टक्के निधी द्यावयाचा होता. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मनपाने या प्रकल्पात निधी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शासनानेच संपूर्ण निधीचा भार उचलत १५ कोटी मंजूर केले. टप्प्या-टप्प्याने हा निधी प्राप्त झाला. ९.५ कोटी खर्च झाल्यानंतरही प्रशासनाकडे ५.५ कोटी रुपये शिल्लक होते. मात्र, काम थांबल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला. परिणामी वाढीव निधीची मागणी सुरू झाली. हा वाढीव निधी डीपीसीतून देण्याचे मान्य केल्यामुळे आता एकूण ७.२१ कोटीचे नवीन अंदाजपत्रक तयार करून उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.

डीपीसीतून दोन कोटी देणार अकोला शहरातील रखडलेल्या सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटीचा निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. त्यामुळे सांस्कृतिक भवनाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपुरा निधी व काही तांत्रिक मंजुरी अभावी सांस्कृतिक भवनाचे काम थांबले होते.

हेही वाचा: पिण्याच्या पाण्यासाठी यांना करावा लागतोय जीवघेणा संघर्ष; पाहा व्हिडिओ

जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांनी निधी देण्याचे मान्य केल्यामुळे सांस्कृतिक भवनाचे अंतर्गत काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आहे.

- गणेश जाधव,

जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
loading image
go to top