लालपरीचा प्रवास महागला; ऐन दिवाळीत प्रवाशांवर पडणार बोजा

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लालपरीचा प्रवास १५ ते २० टक्के महागणार आहे.
msrtc
msrtc SAKAL

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढते आर्थिक संकट आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या डिझेलच्या किंमती आणि कोरोनामुळे झालेली व्यावसाय हानी लक्षात घेता एसटीचे प्रवास भाडे वाढण्याचा निर्णय घेतला आहे. या भाढेवाढीला राज्य सरकारचा हिरवा कंदिल मिळाल्याने ता. २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लालपरीचा प्रवास १५ ते २० टक्के महागणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवास भाडे वाढविण्याचा विचारात होती. डिझेलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यामुळे आधीच एसटीच्या इंधनावर होणाऱ्या भरमसाट खर्चात आणखी वाढ झाली आहे. कोरोनामुळे होत असलेलं आर्थिक नुकसान यामुळे एसटीच्या अकोला विभागाचे उत्पन्न घटले होते. हीच परिस्थिती राज्यभरातील आहे.

रिणामी एसटीच्या भाडेवाढीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात दहा हजार बस धावत असून, दररोज आठ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. यात बहुतांश भाग हा इंधनावरच खर्च करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने महामंडळाला राज्यात दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी व दिवाळीत वाढणारी प्रवाशी संख्या बघता एसटीने भाढेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ता. २६ ऑक्टोबरपासून म्हणेज ता. २५ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

प्रति किलोमीटर २० ते २३ पैसे वाढ

इंधन दरवाढीमुळे होणारा एसटीची तोटा भरून काढण्यासाठी वाढविण्यात आलेल्या दरामुळे आता एसटीचे तिकिट प्रतिकिलोमीटर २० ते २५ पैसांनी महानगणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटीपा प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

प्रमुख शहरापर्यंत अशी असेल दरवाढ (रुपयात)

शहर आधीचे दर वाढीव दर

खामगाव ६५ ७०

शेगाव ७० ८०

वाशीम १०० १२५

अमरावती १३० १५०

नागपूर ३३५ ३६५

औरंगाबाद ३३५ ३६५

पुणे ६७० ७३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com